भारताला अमेरिकेकडून मिळणार मोठं दिवाळी गिफ्ट, टॅरिफवर चर्चा; व्यापार कराराबाबत मोठी माहिती

Last Updated:

भारत आणि अमेरिकेदरम्यान टॅरिफविषयक मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे

News18
News18
नवी दिल्ली :   भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या तणावाची स्थिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केल्यामुळे भारताला फटका बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा टॅरिफ कमी व्हावा यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. अमेरिका-भारत यांच्यात व्यापार वाढवण्यासंदर्भात बैठका चालू आहेत. दरम्यान भारताला मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. लवकरच अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
भारत आणि अमेरिकेदरम्यान टॅरिफविषयक मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. दोन्ही देशांदरम्यान अद्याप कोणतेही शुल्क किंवा करार अंतिम झालेला नाही, तसेच व्यापार करारासाठी कोणतीही अंतिम मुदत ठरवलेली नाही. . विशेष म्हणजे भारतावर लादण्यात आलेला टॅरिफ 15 ते 16 टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
सूत्रांच्या मते, भारताचे वाणिज्य सचिव अमेरिकेला भेट दिल्यावेळी या व्यापार करारावर सविस्तर चर्चा झाली.
advertisement
त्यापूर्वी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या भारत भेटीदरम्यानही दोन्ही देशांमध्ये चर्चाच्या फेऱ्या झाल्या.
याआधी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी मंडळानेही भारतात येऊन प्राथमिक चर्चा केली होती. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, दोन्ही देशांमधील संवाद सातत्याने सुरू आहे आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर सकारात्मक प्रगती होत आहे.

ट्रम्प-मोदी यांच्यात झालेल्या चर्चेत काय घडले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून चर्चा केली. चर्चा प्रामुख्याने व्यापार आणि ऊर्जा मुद्द्यांवर केंद्रित होती. ट्रम्प म्हणाले की पंतप्रधान मोदींनी त्यांना रशियाकडून तेल खरेदी मर्यादित करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, पंतप्रधान मोदींनी संभाषणाचा संदर्भ देत फक्त असे म्हटले की दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, परंतु त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
advertisement
मोदींनी ट्विटरवर लिहिले की,  राष्ट्रपती ट्रम्प, फोन केल्याबद्दल आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. सणानिमित्त, आपल्या दोन महान लोकशाही जगासाठी आशेचा किरण बनत राहोत आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध एकजूट राहोत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
भारताला अमेरिकेकडून मिळणार मोठं दिवाळी गिफ्ट, टॅरिफवर चर्चा; व्यापार कराराबाबत मोठी माहिती
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement