advertisement

Flight emergency landing: विमानात बॉम्ब....180 प्रवासी अन् 6 क्रू मेंबर्स, 35000 फूटावर प्रवाशांच्या पोटात गोळा, इमर्जन्सी लॅण्डिंग

Last Updated:

Flight emergency landing: विमान अहमदाबादमध्ये सुरक्षितपणे उतरवल्यानंतर लगेचच सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. कोणतीही जोखीम न घेता, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, सीआयएसएफ, पोलीस आणि विमानतळ सुरक्षा पथकांनी तात्काळ कारवाई सुरू केली.

News18
News18
आधीच तांत्रिक कारणामुळे इंडिगोची 200 हून अधिक विमान उड्डाणं रद्द झाली असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 180 प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानात अचानक खळबळ उडाली. मदिना ते हैदराबाद निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. या विमानात १८० हून अधिक प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. ही माहिती मिळताच तातडीने विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. सुदैवाने, तपासणीअंती ही बॉम्बची धमकी खोटी असल्याचं समजलं आणि प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
धमकीचा मेसेज आणि तातडीने निर्णय
विमानातील क्रू मेंबर्सना कथितरित्या एक संदेश प्राप्त झाला होता, ज्यामध्ये विमानात स्फोटक उपकरण ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, वैमानिकाने लगेचच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना म्हणून सुरक्षा यंत्रणांना सज्ज करण्यात आले आणि विमानाला हैदराबादऐवजी अहमदाबादकडे वळवण्यात आले.
advertisement
विमान अहमदाबादमध्ये सुरक्षितपणे उतरवल्यानंतर लगेचच सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. कोणतीही जोखीम न घेता, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, सीआयएसएफ, पोलीस आणि विमानतळ सुरक्षा पथकांनी तात्काळ कारवाई सुरू केली. त्यांनी संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आणि विमानाची कसून तपासणी सुरू केली. तपासणीनंतर ए.सी.पी. व्ही. एन. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही." या घोषणेनंतर विमानातील प्रवाशांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठा दिलासा व्यक्त केला. ही केवळ एक खोटी धमकी होती, हे स्पष्ट झाले.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Flight emergency landing: विमानात बॉम्ब....180 प्रवासी अन् 6 क्रू मेंबर्स, 35000 फूटावर प्रवाशांच्या पोटात गोळा, इमर्जन्सी लॅण्डिंग
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement