सूडाने पेटलेल्या इराणचा अमेरिकेवर हल्ला, अब्राहम लिंकन युद्धनौकेवर बॅलिस्टिक Missiles डागले; भयानक प्रयत्नामुळे जग हायअलर्टवर
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Iran Attack On US: इराणने अमेरिकेच्या USS Abraham Lincoln या विमानवाहू युद्धनौकेला लक्ष्य केल्याचा दावा केल्याने मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे.
तेहरान: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या वृत्तानंतर इराण अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. एका बाजूला इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू असताना आता अमेरिकेचे युद्धनौकादलही त्याच्या निशाण्यावर आल्याची चर्चा आहे. विशेषतः अमेरिकेचे विमानवाहू युद्धनौके USS Abraham Lincoln याला लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला आहे. काही अहवालांनुसार इराणने चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे या अमेरिकन विमानवाहू जहाजाच्या दिशेने डागली. मात्र अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला असून तो खोटा असल्याचे म्हटले आहे. खामेनेई जिवंत असताना त्यांनी या युद्धनौकेला बुडवण्याच्या धमक्या अनेकदा दिल्या होत्या.
अमेरिकेचे हे युद्धनौके एखाद्या अभेद्य किल्ल्यापेक्षा कमी नाही. इराणवर हल्ल्याची तयारी सुरू असताना अमेरिकेने गेल्या सुमारे महिनाभरापासून हे विमानवाहू जहाज अरबी समुद्रात तैनात केले होते. इराणच्या शस्त्रसाठ्यातील सर्वात घातक अस्त्रे म्हणजे त्यांची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे मानली जातात. त्यांची अचूक क्षमता किती आहे, याचा अंदाज अनेक देशांना नाही. त्यामुळे या हल्ल्यात प्रगत क्षेपणास्त्रांचा वापर झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र अब्राहम लिंकन ही साधी युद्धनौका नसून ती संपूर्ण संरक्षण कवचासह चालणारा ‘कॅरियर स्ट्राइक ग्रुप’चा भाग आहे. त्यामुळे इराण खरोखरच तिला बुडवू शकतो का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement

इराणकडे ‘अबू महदी’ नावाची अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे तसेच ‘फतह-2’सारखी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे आहेत. फतह-2 ही ध्वनीच्या वेगाच्या पाचपट (मॅक 5) पेक्षा अधिक वेगाने उडू शकते. त्यामुळे ती रोखणे कठीण मानले जाते. या क्षेपणास्त्रांचे उद्दिष्ट समुद्रातील शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करणे हेच आहे.
advertisement
इराणची लष्करी रणनीती एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रे डागण्यावर आधारित आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स एकाच वेळी शेकडो ‘शहीद-136’ ड्रोन सोडू शकते. ज्यामुळे शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर ताण येतो आणि त्यांचे इंटरसेप्टर क्षेपणास्त्रसाठे लवकर संपतात.
अब्राहम लिंकन ही केवळ युद्धनौका नसून ती संपूर्ण सैन्यदलासारखी आहे. ती अमेरिकन नौदलाच्या Carrier Strike Group 3 चा भाग आहे. यात Carrier Air Wing Nine एम्बार्क असून Destroyer Squadron 21 मधील जहाजेही समाविष्ट असतात. हे संपूर्ण ताफे एकत्रितपणे काम करतात.
advertisement
अब्राहम लिंकन ही न्यूक्लियर-पॉवर्ड विमानवाहू नौका असून तिचे वजन 1 लाख टनांहून अधिक आहे. ती जगातील सर्वात मोठ्या युद्धनौकांपैकी एक आहे. तिच्यासोबत USS Michael Murphy, USS Spruance आणि USS Frank E. Petersen Jr. यांसारखी गाइडेड-मिसाइल डीस्ट्रॉयर्स असतात, जी एअर डिफेन्स, अँटी-सबमरीन आणि लँड अटॅकसाठी सज्ज असतात.
याशिवाय 1 ते 2 न्यूक्लियर अटॅक सबमरीन जसे की व्हर्जिनिया किंवा लॉस एंजेलिस क्लास ताफ्यात असतात. ज्या शत्रूच्या जहाजांवर लक्ष ठेवतात आणि टॉमहॉक क्षेपणास्त्रे डागू शकतात. त्यासोबत दारुगोळा, इंधन आणि पुरवठा करणारी जहाजेही असतात. एकूणच 1 विमानवाहू नौका + 3 ते 6 सरफेस कॉम्बॅटंट्स + 1 ते 2 सबमरीन्स + सपोर्ट शिप्स असा हा संपूर्ण ताफा असतो.
advertisement
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न उपस्थित होतो की इराण खरोखरच अमेरिकेच्या या विमानवाहू नौकेला लक्ष्य करू शकतो का? तज्ज्ञांच्या मते इराणकडे प्रगत क्षेपणास्त्रे आणि ड्रोन क्षमता असली तरी अमेरिकन नौदलाची संरक्षणव्यवस्था अत्यंत मजबूत आहे. अब्राहम लिंकन कधीही एकटी फिरत नाही; तिच्यासोबत पूर्ण ‘कॅरियर स्ट्राइक ग्रुप’ असतो. संरक्षणासाठी तैनात विध्वंसक जहाजे ‘एजिस’ कॉम्बॅट सिस्टम आणि एसएम-6 इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा वापर करतात, जे शेकडो किलोमीटर अंतरावरून धोका निष्प्रभ करू शकतात.
advertisement

हल्ल्यापूर्वी अमेरिकन नौदल इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर तंत्रज्ञानाचा वापर करते. EA-18G ग्रोलर सारखी लढाऊ विमाने आणि जहाजांवरील जॅमर प्रणाली शत्रूच्या रडार प्रणालींना बाधित करू शकतात, ज्यामुळे क्षेपणास्त्रांची दिशा बदलू शकते.
निमिट्झ श्रेणीतील विमानवाहू नौका सुमारे 1 लाख टन वजनाची असली तरी ती 25 नॉट्सपेक्षा अधिक वेगाने सतत प्रवास करते. उघड्या समुद्रात इतक्या वेगाने हालचाल करणाऱ्या लक्ष्याचा अचूक मागोवा घेणे अत्यंत कठीण असते, विशेषतः रिअल-टाइम सॅटेलाइट निगराणी मर्यादित असताना.
advertisement
तज्ज्ञांचे मत आहे की अशा हल्ल्यामुळे जहाजाचे नुकसान होऊ शकते किंवा उड्डाण ऑपरेशन्स तात्पुरते थांबू शकतात; मात्र ते पूर्णपणे बुडवणे अत्यंत कठीण आहे. आधुनिक सुपरकॅरियर्स दुहेरी संरचना आणि अनेक जलरोधक कप्प्यांसह बनवले जातात, जेणेकरून ते मोठ्या प्रमाणावरील हल्ल्यांनाही तोंड देऊ शकतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 9:57 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
सूडाने पेटलेल्या इराणचा अमेरिकेवर हल्ला, अब्राहम लिंकन युद्धनौकेवर बॅलिस्टिक Missiles डागले; भयानक प्रयत्नामुळे जग हायअलर्टवर








