Israel Iran Conflict: इस्रायल-इराण संघर्षात चीनची एन्ट्री, तेहरानमध्ये चिनी विमानं दाखल, अमेरिकेला चॅलेंज!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Israel Iran Conflict: इस्रायल आणि इराणचा संघर्ष वाढीस लागला आहे. इराणच्या हल्ल्यात इस्रायलच्या काही शहरांचे नुकसान झाले आहे. इस्रायल आणि इराणच्या संघर्षात आता चीनची एन्ट्री झाली आहे.
Israel Iran Conflict: इस्रायलने इराणवर हल्ला करत अणू संशोधन केंद्रांना लक्ष्य केले. या हल्ल्यात इराणच्या लष्करप्रमुखांसह शास्त्रज्ञ ठार झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या इराणने प्रत्युत्तरात कारवाई केली. इस्रायल आणि इराणचा संघर्ष वाढीस लागला आहे. इराणच्या हल्ल्यात इस्रायलच्या काही शहरांचे नुकसान झाले आहे. इस्रायल आणि इराणच्या संघर्षात आता चीनची एन्ट्री झाली आहे. चीनची कृती ही अमेरिकेला थेट चॅलेंज असल्याची चर्चा आहे.
इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता चीनने उडी घेतली आहे. खरं तर, तेहरानमध्ये चिनी मालवाहू विमान उतरल्याच्या बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, या मालवाहू विमानाने रडारवर पकडले जाऊ नये म्हणून त्याचे ट्रान्सपॉन्डर बंद केले होते. चीनने या मालवाहू विमानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा पुरवठा केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
advertisement
JUST IN: 🇨🇳🇮🇷 Chinese cargo aircraft lands in Iran after turning off transponder during flight. pic.twitter.com/sBqIrg5cBk
— BRICS News (@BRICSinfo) June 15, 2025
ट्रान्सपॉन्डर बंद असताना चिनी मालवाहू विमान तेहरानमध्ये उतरवणे ही एक गुप्त कारवाई असल्याचे संकेत आहे, अशी चर्चा आहे. चीन आणि इराणमधील धोरणात्मक भागीदारी आणि लष्करी सहकार्याचा इतिहास पाहता, असे मानले जाते की त्यात लष्करी उपकरणे किंवा बंदी घातलेल्या वस्तू असू शकतात.
advertisement
इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या या संघर्षात चीनने आधीच इराणची बाजू घेतली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी यापूर्वी म्हटले होते की, बीजिंग इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि इराणच्या सार्वभौमत्वाचे, सुरक्षिततेचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणाऱ्या कृतींना विरोध करत असल्याचे त्यांनी म्हटले.
इस्रायली हल्ल्यांबद्दल चीननेही तीव्र चिंता व्यक्त केली होती. ऑपरेशन रायझिंग लायनचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा चीनने दिला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "चीन इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि या कारवाईच्या संभाव्य गंभीर परिणामांबद्दल त्यांना तीव्र चिंता आहे. चीन इराणच्या सार्वभौमत्वाचे, सुरक्षिततेचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणाऱ्या कृतींना विरोध करतो आणि तणाव वाढवणाऱ्या आणि संघर्ष वाढवणाऱ्या पावलांना विरोध करत असल्याचे त्यांनी म्हटले.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
June 15, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran Conflict: इस्रायल-इराण संघर्षात चीनची एन्ट्री, तेहरानमध्ये चिनी विमानं दाखल, अमेरिकेला चॅलेंज!


