इराणमधून आली मोठी बातमी, युद्धानंतर हाती लागला खतरनाक 'खजिना'; इस्रायलचा गेम झाला, आता होणार रिव्हर्स इंजिनीयरिंग

Last Updated:

Iran News: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर परतताना आपले शेकडो अत्याधुनिक ड्रोन मागे सोडले. जे आता इराण रिव्हर्स इंजिनीयरिंगद्वारे वापरण्याजोगे बनवत आहे. हे ड्रोन भविष्यात इस्रायलविरोधात वापरण्यात येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

News18
News18
तेहरान: इराणमध्ये विध्वंस माजवून इस्रायल परत तर गेला पण त्याने मागे मोठा खजिना सोडला आहे. तुम्ही विचार करत असाल की युद्धात इस्रायल खजिना का घेऊन गेला असेल? तर इस्रायलने इराणमध्ये आपले शेकडो अत्याधुनिक ड्रोन मागे सोडले आहेत. ज्यावर आता इराण रिव्हर्स इंजिनीयरिंग करत आहे. येरिडॉट अहरोनोत (Yedioth Ahronoth) या इस्रायली वृत्तपत्राने संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की काही शंभर दशलक्ष डॉलरच्या किमतीचे ड्रोन गायब झाले आहेत. आता इराण त्यांना पुढच्या युद्धात वापरण्यायोग्य बनवत आहे. हे कळताच इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांची अडचण ठरणे निश्चित आहे.
रिव्हर्स इंजिनीयरिंग म्हणजे नेमकं काय?
रिव्हर्स इंजिनीयरिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एखादी वस्तू वेगवेगळ्या भागांमध्ये विभागली जाते आणि प्रत्येक भागावर सखोल संशोधन केले जाते. ती वस्तू कशी बनवली आहे. त्यात कोणते घटक वापरले गेले आहेत, तिची रचना कशी आहे, तिची संरचना कशी तयार केली आहे, हे सगळं तपासलं जातं.
advertisement
याचे अनेक टप्पे असतात – प्रथम ड्रोन उघडून किंवा त्याच्या कॉम्पोनेंट्सना स्कॅन करून इलेक्ट्रॉनिक डेटा गोळा केला जातो. उदा. त्याचे फर्मवेअर, रडार आणि सेन्सर कसे काम करतात, याचा अभ्यास केला जातो. त्यानंतर वैज्ञानिक त्यावर रिसर्च करतात. त्याचे प्रोसेसर, मोटर्स, कम्युनिकेशन चिप्स, कॅमेरे आणि एअरफ्रेम मटेरियल यांचं बारकाईने विश्लेषण केलं जातं.
advertisement
मॉडेलिंग आणि सिम्युलेशन
यानंतर CAD सॉफ्टवेअर या प्रणालीत ड्रोनची डिजिटल कॉपी तयार केली जाते आणि सिम्युलेशनद्वारे त्याची शक्ती तपासली जाते की, तो कसा बनवला गेला आहे आणि त्याची ताकद इतकी अधिक कशी आहे. यानंतर त्याचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होते – जसे की इंजिन, पंखे, कंट्रोल सॉफ्टवेअर इत्यादी. एवढ्यावरच न थांबता, काही वेळा यापेक्षा कितीतरी पटींनी चांगले प्रॉडक्ट तयार केले जातात. थेट शब्दांत सांगायचं झाल्यास, रिव्हर्स इंजिनीयरिंग म्हणजे उत्तम प्रॉडक्टची हुबेहुब नक्कल करून त्यापेक्षा जास्त ताकदवान नवीन वस्तू तयार करण्याची प्रक्रिया आहे. यासाठी ना परवाना लागतो ना कोणताही अडथळा येतो.
advertisement
इस्रायलने कोणते ड्रोन सोडले?
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने मध्यम अंतरावर मारा करू शकणारे हर्मेस (Hermes) ड्रोन सोडले होते. जे गुप्तचर आणि देखरेख (Surveillance) कार्यांसाठी वापरले जातात. याशिवाय एफपीव्ही (First-Person View) मिनी-क्वाडकॉप्टर ड्रोनही सोडले होते. जे अत्यंत लहान असतात आणि स्फोटकांनी भरलेले असतात. क्षणात विध्वंस घडवू शकणारे हे ड्रोन यूक्रेन सध्या रशियावर हल्ल्यांमध्ये वापरत आहे.
advertisement
इराणने याआधीच अमेरिकन RQ-170 ड्रोनवर रिव्हर्स इंजिनीयरिंग केली आहे आणि आता त्याच पायावर नवीन स्टेल्थ ड्रोन तयार करत आहे.
इराण हे ड्रोन बनवू शकला तर काय होईल?
FPV आणि FP-wing प्रकारचे ड्रोन स्टेल्थ असतात आणि हवेतून शत्रूच्या हद्दीत सहज घुसू शकतात. हे ड्रोन इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिमला गोंधळात टाकू शकतात. लाकूड आणि मेटल मिश्रित एअरफ्रेममुळे इस्रायलच्या रडारवर हे निष्प्रभ ठरू शकतात. हर्मेससारखे ड्रोन दूर अंतरावरून गुप्तचर कामे करू शकतात आणि क्षेपणास्त्र केंद्रांची देखरेख करू शकतात. S-171 Simorghसारखे ड्रोन युद्ध काळात हवाई हल्ले, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि मिसाईल लाँचिंगमध्ये उपयुक्त ठरू शकतात.
advertisement
इतकंच नव्हे इराण जर हे ड्रोन यशस्वीपणे तयार करू शकला तर तो ते इतर देशांना विकूही शकतो आणि प्रचंड पैसा कमावू शकतो.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराणमधून आली मोठी बातमी, युद्धानंतर हाती लागला खतरनाक 'खजिना'; इस्रायलचा गेम झाला, आता होणार रिव्हर्स इंजिनीयरिंग
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement