Operation Sindoor: ड्रोन हल्ल्यात सापडलं भारतीय विमान, 6 खासदारांचा जीव होता धोक्यात, 40 मिनिटं हवेत घिरट्या

Last Updated:

Operation Sindoor: भारतीय खासदारांना घेऊन जाणारं विमान ड्रोन हल्ल्यात सापडलं. लँडींग करता न आल्याने विमान तब्बल ४० मिनिटं हवेत घिरट्या घालत होतं.

सांकेतिक फोटो
सांकेतिक फोटो
दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून बदला घेतला. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षाला तोंड फुटलं. दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. पण चार दिवसांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली. युद्धविराम झाल्यानंतर आता भारताने ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरातील विविध देशांना पोहोचवण्यासाठी भारतातील सर्वपक्षीय खासदारांची काही शिष्टमंडळं विविध देशांमध्ये पाठवली आहेत. प्रत्येक शिष्टमंडळात पाच ते सहा सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे.
दरम्यान, या खासदारांच्या शिष्टमंडळांपैकी डीएमके खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ शुक्रवारी रशियाची राजधानी मॉस्को येथे दाखल झाले. मात्र हे विमान रशियाच्या हवाई हद्दीत पोहोचताच युक्रेनकडून संपूर्ण शहरावर ड्रोन हल्ले करण्यात आले. अनेक तास युक्रेनचे ड्रोन आकाशातच घिरट्या मारत होते. त्यामुळे भारतीय खासदारांचं हे शिष्टमंडळ धोक्यात आलं होतं. कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या विमानाला लँडींग करायला अडचणी येत होत्या. त्यामुळे हे विमान तब्बल 40 मिनिटं आकाशातच घिरट्या घालत होतं. अखेर धोका टळल्यानंतर विमानाचे लँडिंग करण्यात आले.
advertisement
मॉस्कोपासून जवळपास 400 किलोमीटर दूरवर असलेल्या येलेट्स शहरावर युक्रेनने अनेक ड्रोन्स डागले. या हल्ल्यांचा रशियाच्या तब्बल 153 विमान उड्डाणांवर परिणाम झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. मॉस्कोच्या शेरमेत्येवो, डोमोडेडोवो, झुकोवस्की आणि बोनुकोवो या विमानतळांवरील विमान उड्डाणे अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्याचे रशियाच्या रोसावियात्सिया या हवाई सेवा संस्थेने म्हटले आहे.
advertisement
डीएमके खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ रशिया, स्पेनसह पाच देशांचा दौरा करणार आहे. शुक्रवारी हे शिष्टमंडळ मोस्कोत पोहोचलं. इथं मोस्कोतील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी शिष्टमंडळाचं स्वागत केलं. कनिमोळी यांच्या शिष्टमंडळात राजीव राय, कॅप्टन ब्रिजेश चौटा, प्रेम चंद गुप्ता, अशोक मित्तल आणि राजदूत मंजीव पुरी यांचा समावेश आहे. रशियानंतर हे शिष्टमंडळ स्लोवेनिया, ग्रीस, लातविया आणि स्पेन येथे जाणार आहे. या घटनेनंतर रशियाच्या अधिकाऱ्यांनी देशाच्या हवाई संरक्षण दलाने रात्रभर 105 ड्रोन पाडल्याचा दावा केला.
मराठी बातम्या/विदेश/
Operation Sindoor: ड्रोन हल्ल्यात सापडलं भारतीय विमान, 6 खासदारांचा जीव होता धोक्यात, 40 मिनिटं हवेत घिरट्या
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement