न्यूयॉर्क हादरलं, मॅनहॅटनच्या अप्पर ईस्ट साइडमध्ये भयंकर स्फोट; लोकांमध्ये दहशत,धुराच्या ढगाखाली आकाश काळवंडलं
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Explosion Rocks New York : न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये सकाळीच एक भीषण स्फोट होऊन आकाश काळ्या धुराने व्यापले. घटनेनंतर दमकल आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले.
न्यूयॉर्क: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनच्या अप्पर ईस्ट साइडमध्ये शुक्रवारी सकाळी एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आकाशात धुराचे मोठे लोट पसरले.
सकाळी सुमारे 10 वाजता ईस्ट 95 स्ट्रीट आणि 2 ॲव्हेन्यूजवळ हा स्फोट झाला. ज्यामुळे तिथे मोठा आगडोंब उसळला. या घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
🚨 #BREAKING: Explosion rocks NEW YORK CITY
Massive explosion has ROCKED the Upper East Side with over 100 firefighters and first responders on scene. Cause still unknown pic.twitter.com/bMOJDchtpj
— The Patriot Oasis™ (@ThePatriotOasis) August 15, 2025
advertisement
सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये या स्फोटानंतर आकाशात धुराचे मोठे लोट पसरलेले दिसत आहेत, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी 100 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान आणि बचावकर्ते तातडीने दाखल झाले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 9:37 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
न्यूयॉर्क हादरलं, मॅनहॅटनच्या अप्पर ईस्ट साइडमध्ये भयंकर स्फोट; लोकांमध्ये दहशत,धुराच्या ढगाखाली आकाश काळवंडलं


