advertisement

धक्कादायक! कामाचा ताण कमी करण्यासाठी नर्सकडून १० रुग्णांची हत्या

Last Updated:

पश्चिम जर्मनीतील वुर्सेलेन रुग्णालयात एका पुरुष नर्सने कामाचा ताण कमी करण्यासाठी १० रुग्णांची हत्या केली आणि २७ जणांना मारण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने जन्मठेप सुनावली.

News18
News18
कामाचा प्रचंड ताण आणि सतत मिळणारी नाईट शिफ्ट यामुळे वैतागलेल्या तरुणाने जे केलं ते फार भयंकर होतं. संतापाच्या भरात त्याने एक दोन नाही 10 रुग्णांच्या हत्येचा थंड डोक्याने कट रचला. त्यांची हत्या केली आणि कामाच्या ताणाचा निषेध केला. पुरुष नर्स असलेल्या या व्यक्तीनं 10 रुग्णांची हत्या केली. इतकंच नाही तर त्याने 27 जणांना मारण्याचा प्रयत्न केला. एका पुरुष नर्सला १० रुग्णांची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने या नर्सने रुग्णांना जीवघेणे औषध देऊन त्यांची हत्या केल्याचे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने त्याला १० रुग्णांच्या हत्येसह आणखी २७ रुग्णांना मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. ही धक्कादायक घटना पश्चिम जर्मनीमध्ये घडली.
नाइट शिफ्टमध्ये करायचा हत्या
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोषी नर्सने शांत झोप लागणारी आणि वेदनाशामक औषधे वापरून आपल्या रुग्णांची हत्या केली. ज्या रुग्णांची हत्या करण्यात आली, त्यापैकी बहुसंख्य वृद्ध होते. अहवालानुसार, या नर्सने रात्रीच्या नाइट शिफ्ट दरम्यान आपला कामाचा भार कमी करण्यासाठी या रुग्णांना टार्गेट केलं होतं. रात्रीभर जास्त मेहनत करावी लागू नये आणि रुग्ण लवकर झोपी जावेत, या उद्देशाने नर्सने ही हत्यासत्र सुरू केल्याचे अभियोजन पक्षाचे म्हणणे आहे.
advertisement
झोपेचं आणि वेदनाशामक इंजेक्शनचा ओवरडोस
या नर्सचे नाव गुप्त ठेवण्यात आलं असून त्याची कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, तपासामध्ये असे उघड झाले आहे की, त्याने अनेक रुग्णांना मॉर्फिन आणि मिडाझोलम यांसारख्या औषधांची आवश्यकतेपेक्षा जास्त मात्रा दिली. ही औषधे इतकी तीव्र होती की त्यांचा अति डोस रुग्णांचा जीव घेऊ शकत होता. डिसेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत पश्चिम जर्मनीतील वुर्सेलेन येथील एका रुग्णालयात या हत्या झाल्या होत्या.
advertisement
तपास आणि शिक्षेचा कालावधी
या आरोपी पुरुष नर्सला २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याने २००७ मध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि २०२० पासून तो याच रुग्णालयात कार्यरत होता. न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेनुसार, जर्मनीतील कायद्यानुसार त्याला किमान १५ वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. सध्या तपासकर्ते या नर्सशी संबंधित असलेल्या इतर संशयित प्रकरणांचीही चौकशी करत आहेत, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
advertisement
नाएल्स हेगेल प्रकरणाची आठवण
जर्मनीत घडलेल्या या भीषण घटनेमुळे २०१७ मधील नाएल्स हेगेल प्रकरणाची आठवण झाली आहे. २०१७ मध्ये नाएल्स हेगेल या पुरुष नर्सला जर्मनीतील दोन रुग्णालयात तब्बल ८५ रुग्णांची हत्या केल्याबद्दल २०१९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कामाचा ताण आणि मनोरुग्णता यातून त्याने हे कृत्य केले होते. त्यामुळे या नवीन प्रकरणातही आरोग्य क्षेत्रातील नैतिकतेवर आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
धक्कादायक! कामाचा ताण कमी करण्यासाठी नर्सकडून १० रुग्णांची हत्या
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement