Mir Jafar Operation: आधी पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं नंतर धडाधड अटकसत्र; नेमकं आहे काय ऑपरेशन मीर जाफर?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
एकीकडं लष्करानं पाकिस्तानाला दिवसा तारे दाखवले तर दुसरीकडं भारतीय गुप्तचर यंत्रणांनी भारतात दडून बसलेल्या गद्दारांचा शोध सुरु केला.
Operation Mir Jafar News: काही पैशांसाठी देशाशी गद्दारी करणाऱ्या एक दोन नव्हे तर तब्बल 12 गद्दारांना सुरक्षा दलानं बेड्या ठोकल्या आहेत. या घरभेद्यांनी काही देशाच्या संरक्षणासंदर्भात छायाचित्रे आणि इतर महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवली. या गद्दारांना जेरबंद करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ऑपरेशन मीर जाफर राबवलं.
ज्योती मल्होत्रा,दवेंद्र ढिल्लो,नोमान इलाही,अरमान हे केवळ चारच नाही तर देशाशी गद्दारी करणाऱ्या 12 जणांना सुरक्षा दलाने बेड्या ठोकल्या आहेत. पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेनं फेकलेल्या जाळ्यात हे सर्वजण अडकले.. या घरभेद्यांनी काही देशाच्या संरक्षणासंदर्भात छायाचित्रे आणि इतर महत्त्वाची माहिती या हेरांनी पाकला पुरवली. या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सुरक्षा दलानं राबवलं ऑपरेशन मीर जाफर...या कारवाई अंतर्गत युट्यूबर ज्योती मल्होत्राला हिसारमध्ये अटक करण्यात आली.
advertisement
पाकिस्तानाला दाखवले दिवसा तारे
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं सर्वात आधी पाकिस्तानाचा हिशोब चुकता केला. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले.या ऑपरेशनमध्ये शेकडो दहशतवादी मारले गेले. भारताच्या लष्करी कारवाईनंतर पाकिस्ताननं ड्रोन आणि मिसाईल्सच्यामाध्यमातून हल्ला करण्याता प्रयत्न केला. पण भारतीय हवाई संरक्षण प्रणालीनं पाकिस्तानचा नापाक डाव हाणून पाडला. त्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानी हवाई दलाला जोरदार धक्का दिला. पाक लष्कराचे 9 हवाई तळ भारतानं जमीनदोस्त केले. एकीकडं लष्करानं पाकिस्तानाला दिवसा तारे दाखवले तर दुसरीकडं भारतीय गुप्तचर यंत्रणांनी भारतात दडून बसलेल्या गद्दारांचा शोध सुरु केला.
advertisement
ऑपरेशन मीर जाफर नेमकं आहे तरी काय?
पैशांसाठी भारताशी गद्दारी करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी ऑपरेशन मीर जाफर सुरु केलं. भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षदरम्यान त्या गद्दारांनी पाकिस्तानला गुप्तमाहिती पुरवली होती. ते भारतात राहून पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत होते. भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती पुरवत होते. पण जास्तकाळ त्यांचा तो खेळ लपून राहिला नाही. भारतीय तपास यंत्रणांनी त्यांचे धागेदोरे शोधून काढले . त्यामध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्रा तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकली. दरम्यान पाकिस्तानी दुतावासातील कर्मचारी दानिश तपास यंत्रणांच्या रडारवर आला आणि मग एक एक करीत गद्दार तपास यंत्रणांच्य़ा हाती लागले.
advertisement
मीर जाफर नाव का दिलं?
भारतीय उपखंडात इंग्रजांना शिरकाव करण्यासाठी गद्दार मीर जाफरनं मदत केली होती. त्यामुळेच या ऑपरेशनला त्याचं नाव देण्यात आलं होतं. अवघ्या काही दिवसातचं भारतीय़ तपास यंत्रणांना देशात लपलेल्या आजच्या काळातील मीर जफरला एक एक करीत शोधून गजाआड केलं.
view commentsLocation :
Delhi
First Published :
May 20, 2025 9:51 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Mir Jafar Operation: आधी पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं नंतर धडाधड अटकसत्र; नेमकं आहे काय ऑपरेशन मीर जाफर?


