Nobel Peace Prize: ट्रम्प यांचे स्वप्न भंगले, लोकशाहीची नायिका मारिया कोरिना माचादो यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार

Last Updated:

Nobel Peace Prize 2025 Maria Corina Machado: व्हेनेझुएलामध्ये लोकशाहीसाठी अविरत लढा देणाऱ्या मारिया कोरिना माचादो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीने त्यांच्या हुकूमशाहीविरोधातील संघर्ष आणि शांततामय परिवर्तनासाठीच्या प्रयत्नांचा गौरव केला आहे.

News18
News18
ओस्लो: नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज प्रतिष्ठेचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. व्हेनेझुएलामधील लोकशाहीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्या मारिया कोरिना माचादो यांना या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी आपल्या देशात लोकशाही हक्कांचे संरक्षण आणि प्रसार, तसेच हुकूमशाहीतून लोकशाहीकडे शांततामय संक्रमण घडविण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे हा जागतिक सन्मान मिळवला आहे.
advertisement
नोबेल पुरस्कार समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की- व्हेनेझुएलामधील सध्याच्या तानाशाही राजवटीमुळे राजकीय कार्य करणे अत्यंत कठीण झाले आहे. मात्र मारिया माचादो यांनी या परिस्थितीतही जनतेच्या आवाजासाठी निर्भयपणे लढा दिला.
मारिया माचादो यांनी ‘सुमाते’ (SUMATE) नावाची एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. जी देशात लोकशाही व्यवस्थेच्या मजबुतीसाठी आणि निवडणुकांच्या पारदर्शकतेसाठी कार्य करते. त्या अनेक वर्षांपासून मोफत आणि निष्पक्ष निवडणुकांची मागणी करत आहेत.
advertisement
दरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून नोबेल शांतता पुरस्कारासाठी आपली दावेदारी मांडत होते. त्यांनी भारत-पाकिस्तानसह अनेक देशांमधील संघर्ष थांबवल्याचा दावा केला होता. परंतु नोबेल समितीने यंदा त्यांची निवड न करता मारिया माचादो यांनाच सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.
पुरस्कार विजेत्याला 11 मिलियन स्वीडिश क्रोना (सुमारे 10.3 कोटी रुपये), सोनेरी पदक आणि सन्मानपत्र दिले जाणार आहे. हा पुरस्कार 10 डिसेंबर रोजी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे पार पडणाऱ्या सोहळ्यात प्रदान केला जाईल.
advertisement
या घोषणेमुळे व्हेनेझुएलामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, माचादो यांना “लोकशाहीची योद्धा” आणि “शांततेचे प्रतीक” म्हणून गौरवले जात आहे. जगभरातील नेते आणि मानवाधिकार संघटनांनी त्यांच्या या ऐतिहासिक विजयाचे स्वागत केले आहे.
advertisement
या वर्षी या पुरस्कारासाठी तब्बल 338 उमेदवारांची नावे समोर आली होती. ज्यामध्ये 244 व्यक्ती आणि 94 संस्था सहभाग होता. या सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे होय.
ट्रम्प यांनी अनेक वेळा सार्वजनिकरित्या असे म्हटले होते की- त्यांना हा पुरस्कार मिळायलाच हवा, कारण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी भारत-पाकिस्तानसह 7 युद्धे थांबविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र तज्ज्ञांचे मत आहे की या वेळी ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता अत्यंत कमी आहे. या यादीत आणखी काही महत्त्वाची नावे आहेत- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान, टेस्लाचे CEO इलॉन मस्क, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि पोप फ्रान्सिस (ज्यांचे एप्रिल महिन्यात निधन झाले) यांचा समावेश होता
advertisement
गांधींची कहाणी: पाच वेळा नामांकन, पण एकदाही नोबेल नाही
1901 ते 2024 दरम्यान नोबेल शांतता पुरस्कार 141 वेळा दिला गेला. ज्यात 111 व्यक्ती आणि 30 संस्थांना सन्मानित करण्यात आले. परंतु महात्मा गांधींना एकदाही हा पुरस्कार मिळाला नाही. जरी ते 1937 ते 1948 या काळात पाच वेळा नोबेलसाठी नॉमिनेट झाले होते.
advertisement
1948 साली गांधींना हा पुरस्कार मिळण्याची सर्वाधिक शक्यता होती, पण नामांकन बंद होण्याच्या एक दिवस आधीच त्यांची हत्या झाली. त्या वर्षी नोबेल समितीने कोणालाही शांततेचा पुरस्कार दिला नाही. समितीचे म्हणणे होते की, आम्हाला गांधींसारखी शांती आणि अहिंसेची भावना जोपासणारी योग्य व्यक्ती सापडली नाही.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Nobel Peace Prize: ट्रम्प यांचे स्वप्न भंगले, लोकशाहीची नायिका मारिया कोरिना माचादो यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement