Nobel Prize in Literature: ‘भीतीच्या जगात कला जिवंत ठेवणारा लेखक’, टागोरनंतर आणखी एक इतिहास; हंगेरीच्या लास्जलो क्रास्नाहॉर्कईंना साहित्याचा नोबेल

Last Updated:

Nobel Prize in Literature 2025: हंगेरीचे ख्यातनाम लेखक लास्जलो क्रास्नाहॉर्कई यांना या वर्षीचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या रचनांमधून भीती, अराजकता आणि मानवतेच्या शोधाला कलात्मक स्पर्श मिळतो. ज्यामुळे जगभरात त्यांचं लेखन विचारप्रवर्तक ठरलं आहे.

News18
News18
स्टॉकहोम: या वर्षीचा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हंगेरीच्या प्रसिद्ध लेखक लास्जलो क्रास्नाहॉर्कई (László Krasznahorkai) यांना जाहीर झाला आहे. स्वीडनमधील स्वीडिश अॅकॅडमीने गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली.
advertisement
अॅकॅडमीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की- लास्जलो यांच्या रचना प्रभावशाली, गहन आणि दूरदर्शी आहेत. त्या जगातील भय आणि अस्थिरतेच्या वातावरणातही कलाकृतींची ताकद दाखवतात. पुरस्कारासोबत त्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोना (सुमारे 10.3 कोटी रुपये), एक सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पारंपरिकरित्या हे पुरस्कार 10 डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे प्रदान केले जातील.
advertisement
लास्जलो क्रास्नाहॉर्कई हंगेरीचा तत्त्वचिंतक लेखक
लास्जलो क्रास्नाहॉर्कई हे हंगेरीचे सर्वात प्रतिष्ठित आणि विचारप्रधान समकालीन लेखक मानले जातात. त्यांच्या लेखनशैलीत गहन तत्त्वज्ञान, मानवी अस्तित्वाचे संकट, आणि आधुनिक समाजातील अराजकता यांचा सतत शोध दिसतो.
advertisement
advertisement
त्यांच्या कादंबऱ्या बहुतेकदा गडद, उदास आणि आत्मचिंतनशील असतात. त्यांच्या सर्वात प्रसिद्ध कादंबरींपैकी एकसतांतँगो (Satantango)’ वर आधारित सात तासांची चित्रपटही 1994 मध्ये प्रदर्शित झाली होती हा चित्रपट जागतिक स्तरावर खूप प्रशंसित झाला. तसेच त्यांच्या ‘द मेलँकली ऑफ रेसिस्टन्स (The Melancholy of Resistance)’ या पुस्तकावरही चित्रपट तयार करण्यात आला आहे.
advertisement
या कथांमध्ये एका छोट्या खेड्यातील लोकांचे जीवन, त्यांच्या संघर्षमय वास्तवाची झलक, अराजकतेचे वातावरण आणि मानवी स्वभावातील कमकुवतपणाचे दर्शन घडते. लास्जलो यांच्या रचनांमध्येमानव म्हणजे कायया प्रश्नाला अत्यंत तत्त्वज्ञानात्मक पद्धतीने भिडण्याची ताकद आहे.
advertisement
नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कारांची स्थापना 1895 मध्ये झाली. हे पुरस्कार 1901 पासून दिले जाऊ लागले. सुरुवातीला फक्त भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या पाच क्षेत्रांमध्येच हा सन्मान दिला जात होता. नंतर अर्थशास्त्र क्षेत्रालाही नोबेलचा समावेश करण्यात आला.
1901 ते 2024 या काळात साहित्य क्षेत्रात एकूण 121 लेखकांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. हे पुरस्कार स्वीडिश वैज्ञानिक आणि शोधकर्ता अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल यांच्या इच्छापत्रानुसार दिले जातात. नोबेल समितीच्या नियमांनुसार, प्रत्येक वर्षी नोबेलसाठी नामांकन झालेल्या व्यक्तींची नावे 50 वर्षांपर्यंत गुप्त ठेवली जातात, म्हणजे त्या काळात ती कोणालाही जाहीर केली जात नाहीत.
एशियाचा अभिमान रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर हे आशियातील पहिले लेखक होते ज्यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. 1913 मध्ये, त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहगीतांजलीसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला.
गीतांजलीहे कवितांचे एक सुंदर संकलन आहे. ज्यात टागोर यांनी जीवन, निसर्ग आणि परमेश्वराविषयीचे आपल्या अंतःकरणातील गूढ भावविश्व अत्यंत साध्या पण हृदयस्पर्शी भाषेत मांडले आहे. हे पहिलेच असे वर्ष होते जेव्हा युरोपच्या बाहेरील एखाद्या लेखकाला नोबेल पुरस्कार मिळाला होता. स्वीडिश अॅकॅडमीने त्यांच्या कवितांचे वर्णन करताना म्हटले होते की- त्यांच्या रचनांमध्ये गहन भावना आणि सुंदर भाषेचा अप्रतिम संगम आहे.
लास्जलो क्रास्नाहॉर्कई यांच्या विजयानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की साहित्य म्हणजे फक्त कथा नाही ती मानवाच्या अस्तित्वाचा आरसा आहे, जो भीतीच्या अंधारातही आशेचा उजेड दाखवतो.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Nobel Prize in Literature: ‘भीतीच्या जगात कला जिवंत ठेवणारा लेखक’, टागोरनंतर आणखी एक इतिहास; हंगेरीच्या लास्जलो क्रास्नाहॉर्कईंना साहित्याचा नोबेल
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement