पाकिस्तानने आगीत हात घातला, शस्त्रसंधीनंतर मुनीरची घोडचूक, अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक

Last Updated:

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरचा तणाव वाढत चालला आहे. अफगाणिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमधील पक्तिका प्रांतात काही काळापूर्वीच हवाई हल्ला करण्यात आला आहे.

पाकिस्तानने आगीत हात घातला, शस्त्रसंधीनंतर मुनीरची घोडचूक, अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक
पाकिस्तानने आगीत हात घातला, शस्त्रसंधीनंतर मुनीरची घोडचूक, अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक
मुंबई : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरचा तणाव वाढत चालला आहे. अफगाणिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमधील पक्तिका प्रांतात काही काळापूर्वीच हवाई हल्ला करण्यात आला आहे. दोन्ही देशांमधील 48 तासांची युद्धबंदी आज संध्याकाळी 6.30 वाजता संपण्याच्या काही मिनिटांपूर्वीच हा हल्ला झाला. जरी पाकिस्तानी माध्यमांनी दोहा येथे प्रस्तावित चर्चेपर्यंत युद्धबंदी वाढविण्याचा दावा केला असला तरी, पाकिस्तानी सैन्याने सीमापार हवाई हल्ले केले.

तीन ठिकाणी ड्रोन हल्ले

प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने पक्तिका-दक्षिण वझिरिस्तान सीमेवरील तीन ठिकाणी ड्रोन हल्ले केले. टोलो न्यूजनुसार, एका हल्ल्यात नागरिकांच्या घरांना आणि दोन अफगाण तालिबानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले.

अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर हल्ला

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकिस्ताकडून अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हवाई हल्ला करण्यात आला. काबुलमधल्या या हल्ल्याची जबाबदारी तहरीक -ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेनं स्वीकारली. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर अफगाणिस्ताननेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. अफगाणिस्तानच्या काबूलमधील हवाई हल्ल्यानंतर अफगाण सैन्याने डुरंड सीमारेषेवरील (पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा) पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला, तसंच अफगाण सैन्याने काही पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानने आगीत हात घातला, शस्त्रसंधीनंतर मुनीरची घोडचूक, अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement