विनाश काले विपरीत बुद्धि, PM शरीफ यांनी स्वत:चा घात केला; लष्करप्रमुख मुनीरला Promotion दिले

Last Updated:

Pakistan Government: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकराने पाकिस्तानने लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांना 'फील्ड मार्शल' पदावर बढती दिली आहे. भारताविरुद्धच्या 'रणनीतिक नेतृत्वा'साठी ही बढती देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. ज्यामुळे 'विनाशकाले विपरीत बुद्धी' या म्हणीची आठवण होते.

News18
News18
इस्लामाबाद: पाकिस्तानच्या सरकारने लष्करप्रमुख जनरल सय्यद आसिम मुनीर यांना 'फील्ड मार्शल' या पदावर बढती देण्यास मान्यता दिली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भारताविरुद्ध विजय? 
सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार भारताविरुद्धच्या ऑपरेशनमधील त्यांच्या रणनीतिक नेतृत्वासाठी आणि शत्रूवर निर्णायक विजय मिळवल्याबद्दल जनरल आसिम मुनीर यांना बढती देण्यात आली आहे. या बढतीमुळे जनरल मुनीर हे पाकिस्तानच्या लष्करी इतिहासातील 'फील्ड मार्शल' पद भूषवणारे दुर्मिळ अधिकारी ठरले आहेत.
एअर चीफ मार्शल सिद्धू यांनाही मुदतवाढ
याच बैठकीत मंत्रिमंडळाने एअर चीफ मार्शल झहीर बाबर सिद्धू यांनाही त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या हवाई दलात त्यांचा अनुभव आणि नेतृत्व आणखी काही काळ उपलब्ध राहणार आहे. या बढत्या आणि मुदतवाढ या पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वात मोठे बदल दर्शवतात आणि आगामी काळात त्याचा देशाच्या संरक्षण धोरणावर परिणाम होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
विनाश काले विपरीत बुद्धि, PM शरीफ यांनी स्वत:चा घात केला; लष्करप्रमुख मुनीरला Promotion दिले
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement