पाठीत खंजीर खुपसल्याने चीन सूडाच्या तयारीत; जागतिक राजकारणात मोठा स्फोट, शहबाज-मुनीरच्या फितुरीमुळे जिनपिंग संतापले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Pakistan China Relation: चीनचा जुना मित्र पाकिस्तान आता ट्रम्पच्या चरणी लीन झाला आहे. अमेरिका-पाकिस्तान जवळीक वाढताना दिसत असून, यामुळे जागतिक राजकारणात मोठा स्फोट होण्याची चिन्हं आहेत आणि चीन आता सूडाच्या तयारीत आहे.
बीजिंग/इस्लामाबाद: चीन-पाकिस्तानची यारी जगजाहीर आहे. दोघंही कायमचे मित्र मानले जातात. पाकिस्तानसाठी चीन काय करत नाही? पैसे असो किंवा शस्त्रं चीन पाकिस्तानला सगळं काही देतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानसाठी उभा राहतो आणि भारतापासून त्याला वाचवतो. ही गोष्ट वेगळी की यामध्ये चीनचा स्वतःचा स्वार्थ असतो. मात्र पाकिस्तानही काही कमी नाही. तो वेळोवेळी चीनप्रती आपली निष्ठा दाखवत आला आहे. पाकिस्तान तर चीनला आपला ‘गुरु’ मानतो. पण आता असं दिसतंय की पाकिस्तानचे पाय घसरले आहेत. पाकिस्तान आता चीनच्या शत्रूच्या मांडीवर बसायला उतावीळ झालाय. होय पाकिस्तान आता आपल्या आका चीनला सोडून अमेरिकेच्या गटात जाण्याचा प्रयत्न करतोय.
खरं तर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात जागतिक राजकारणात नवे समीकरण तयार होताना दिसत आहेत. पाकिस्तान आणि अमेरिकेतील जवळीक वाढताना दिसतेय. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मार खाल्ल्यानंतर पाकिस्तान अमेरिकेचं कौतुक करत थकत नाही. शहबाज शरीफ असोत किंवा मुनीर… सतत ट्रम्पचं गुणगान गातायत. ते दोघं अशा प्रकारे वागतायत जसं ट्रम्पनेच पाकिस्तानला भारतापासून वाचवलं. त्यांना वाटतंय की अमेरिकेच्या सांगण्यावरूनच भारताने सीजफायर केलं. हीच ती गोष्ट आहे ज्या कारणाने शहबाज आणि मुनीर आता ट्रम्पच्या चरणी लीन झाले आहेत.
advertisement
गद्दारी?
इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान करत असलेला अमेरिकेची खुशामत आता चीनबरोबरच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. पाकिस्तानची ही भूमिका त्याच्या जुन्या मित्र चीनला नाराज करेल का? शी जिनपिंग हे असं त्यांच्या मित्राला शत्रूच्या गोटात खेळताना बघत राहतील का? की मग भटकलेल्या आपल्या जुन्या शिष्याला परत रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतील? हे सर्वांनाच माहिती आहे की चीन आणि अमेरिका हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. चीनने पाकिस्तानला स्वतःच्या हितासाठी वाढवलं आहे. अशा परिस्थितीत जिनपिंग नक्कीच पाकिस्तानवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करतील. चीन हे कदापि इच्छित नाही की पाकिस्तान अमेरिकेच्या प्रभावाखाली जावं.
advertisement
पुरावे
पाकिस्तानच्या खुशामतीची साक्ष त्यावेळी अधिक स्पष्ट झाली जेव्हा डोनाल्ड ट्रम्पचं नाव नोबेलसाठी सुचवण्यात आलं. पाकिस्तानने एकमुखाने ट्रम्पचं नाव नोबेलसाठी पाठवण्याची शिफारस केली आहे. ही गोष्ट चीनला निश्चितच खटकली असेल. त्याचबरोबर आसिम मुनीर यांचा ट्रम्पसोबतचा लंचही चीनला नाराज करणाराच होता. यामागचं कारण चीन चांगल्या प्रकारे समजतो. जर पाकिस्तानसारख्या देशाच्या आर्मी चीफला डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये आपल्यासोबत लंच करतात. तर त्यामागे मोठा हेतू असतो – जो कदाचित पाकिस्तानला कळत नसेल, पण चीन मात्र तो सहज समजून घेतो.
advertisement
ट्रम्पची गोडी गुलाबी
इतकंच नाही, तर डोनाल्ड ट्रम्प देखील चीनच्या चेल्यावर म्हणजेच पाकिस्तानवर सातत्याने गोडी गुलाबी करत आहेत. व्हाईट हाऊसमधील आसिम मुनीरचा लंच त्याचं एक उदाहरण आहे. त्याचबरोबर ट्रम्पने शहबाजचं नाव न घेता सीजफायरबद्दल त्याचं कौतुक केलं. कदाचित पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यामागे ट्रम्पचा हेतू इराण आणि सध्याचं युद्ध असावं. एवढंच नाही तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की अमेरिका पाकिस्तानला पाचव्या पिढीचं स्टेल्थ जेट आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचं आमिष दाखवत आहे. हे सांगणं महत्त्वाचं आहे की पाकिस्तान आजवर शस्त्रास्त्रांच्या बाबतीत सर्वाधिक चीनवर अवलंबून राहिला आहे.
advertisement
लिटमस टेस्ट
पाकिस्तान आणि चीनमधील संबंध दशके जुने आहेत. सीपेक – म्हणजेच ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर’ने या मैत्रीला अधिक बळ दिलं आहे. या प्रोजेक्टमध्ये शी जिनपिंगचा जीव अडकला आहे. म्हणूनच चीन पाकिस्तानमध्ये पाण्यासारखा पैसा ओततो आहे. इराण युद्ध पाकिस्तानसाठी एक लिटमस टेस्टसारखं ठरणार आहे. जर अमेरिका इराणसोबत युद्धात उतरते, तर पाकिस्तानला निर्णय घ्यावा लागेल की तो कोणाच्या बाजूने उभा राहणार? एकीकडे इराणचा पाठिंबा देणारा चीन असेल, तर दुसरीकडे इस्रायलच्या बाजूने असणारा अमेरिका. सध्या जे समीकरण दिसत आहेत, त्यावरून असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण मुद्यावर पाकिस्तानला आपल्या गोटात खेचून घेतलं आहे. त्यामुळे पाकिस्तान जर अमेरिकेबरोबर मिळून इराणविरोधात काम करत असेल, तर ते चीनसाठी चिंतेचा विषय ठरू शकतं. कारण चीन आणि इराणमध्येही सामरिक भागीदारी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 21, 2025 4:52 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पाठीत खंजीर खुपसल्याने चीन सूडाच्या तयारीत; जागतिक राजकारणात मोठा स्फोट, शहबाज-मुनीरच्या फितुरीमुळे जिनपिंग संतापले