आसिम मुनीरची चिथावणीखोर भाषा, मुकेश अंबानींना दिली धमकी; पाकिस्तानी लष्करप्रमुखाची भारताला अण्वस्त्राची उघड धमकी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Asim Munir: इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना भारताविरोधात चिथावणीखोर विधान केले. धार्मिक उदाहरण देत मुकेश अंबानींना अप्रत्यक्ष धमकी देत त्यांनी भारताच्या पूर्वेकडून हल्ला सुरू करण्याची भाषा केली.
इस्लामाबाद: पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात चिथावणीखोर विधान करून वाद निर्माण केला आहे. अमेरिकेतील पाकिस्तानी समुदायाला संबोधित करताना मुनीर यांनी भारतीय उद्योगपती रिलायन्सचे CMD मुकेश अंबानी यांना अप्रत्यक्षपणे धमकी दिली.
मुनीर यांनी आपल्या भाषणात म्हटले की- एक ट्विट व्हायरल करण्यात आले होते, ज्यात सूरह फील आणि मुकेश अंबानी यांचा फोटो होता. जेणेकरून पाकिस्तान पुढील वेळी काय करेल याचा संदेश देता येईल. सूरह फीलचा उल्लेख कुराणमध्ये आहे. ज्यात असे म्हटले आहे की, अल्लाहने शत्रूच्या हत्तींवर पक्ष्यांकडून दगडफेक करून त्यांना भुसा बनवल्याचा उल्लेख आहे.
advertisement
मुनीर यांनी धमकी देताना म्हटले आहे की- आम्ही भारताच्या पूर्वेकडून सुरुवात करू. जिथे त्यांचे सर्वात मौल्यवान संसाधने आहेत आणि नंतर पश्चिमेकडे जाऊ.
मुनीर एवढे बोलून थांबले नाहीत. त्यांनी आपल्या अण्वस्त्रांची फुशारकी मारत धमकी दिली की- जर भारताने सिंधू नदीवर कोणताही पूल बांधला तर त्याला क्षेपणास्त्रांनी पाडून टाकले जाईल. मुनीर म्हणाले, आम्ही भारताने पूल बांधण्याची वाट पाहू आणि मग त्याला 10 क्षेपणास्त्रांनी उडवून टाकू. सिंधू नदी ही भारताची वडिलोपार्जित संपत्ती नाही आणि आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही.
advertisement
मुनीर यांच्या या विधानावर भारत सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. याला अण्वस्त्र-सज्ज असलेल्या एका बेजबाबदार देशाची मानसिकता असे म्हटले आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी मुनीर यांचे विधान अत्यंत बेजबाबदार असल्याचे म्हटले असून, पाकिस्तानमधील अण्वस्त्रे अराजकीय घटकांच्या हातात जाण्याचा खरा धोका आहे, असा इशारा दिला आहे. हे विधान पाकिस्तानातील लोकशाहीच्या अनुपस्थितीचे उदाहरण आहे, जिथे खरी सत्ता लष्कराच्या हातात आहे हे सिद्ध करते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2025 3:13 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
आसिम मुनीरची चिथावणीखोर भाषा, मुकेश अंबानींना दिली धमकी; पाकिस्तानी लष्करप्रमुखाची भारताला अण्वस्त्राची उघड धमकी


