Shockwaves In America: ट्रम्प यांच्याकडून मोठी चूक, वाईट बातमी आली; मोदींच्या एका निर्णयाने अमेरिकेत अस्वस्थता

Last Updated:

Modi China Visit: SCO शिखर परिषदेत मोदी-पुतिनची अनपेक्षित जवळीक पाहून अमेरिकन गोटात प्रचंड खळबळ माजली आहे. बोल्टनने इशारा दिला की भारताने रशियाची बाजू घेतली, तर जागतिक महासंग्राम अटळ आहे.

News18
News18
वॉशिंग्टन: आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत, चीन आणि रशिया यांच्यातील संबंधांवर जगाचे लक्ष असताना अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर टीकाकार जॉन बोल्टन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौऱ्यावर आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेतील त्यांच्या उपस्थितीवर जोरदार टीका केली आहे. बोल्टन म्हणाले की, मोदींचा हा दौरा पाश्चिमात्य देशांसाठी वाईट बातमी आहे. कारण या परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनही उपस्थित आहेत.
advertisement
एका मुलाखतीत बोलताना बोल्टन म्हणाले की- येथे बरीच वाईट बातमी आहे आणि खूप कमी चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दशकांपासून पश्चिम देशांनी भारताला सोव्हिएत युनियन रशियाच्या शीतयुद्धाच्या छायेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत क्वाडसारखे सुरक्षा मंच तयार केले. जेणेकरून भारत चीन आणि रशियापासून दूर राहील. पण आता परिस्थिती उलट दिसत आहे. मोदींचा SCO शिखर परिषदेतील सहभाग आणि पुतिन यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करणे हे पाश्चिमात्य देशांच्या रणनीतीला धक्का असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
advertisement
ट्रम्प प्रशासनावरही हल्ला
जॉन बोल्टन यांनी या संपूर्ण प्रकरणात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले की- ट्रम्प प्रशासनाने अनेक दशकांपासून सुरू असलेल्या अमेरिकेच्या प्रयत्नांना धुळीस मिळवले. ट्रम्प यांनी भारतावर लावलेले टॅरिफ (आयात शुल्क) एक मोठी चूक होती. यामुळेच अमेरिका-भारत संबंधांमध्ये तणाव वाढला आणि भारत पुन्हा रशियाच्या जवळ जात आहे. तसेच आता चीनसोबतही सामरिक संबंधांची शक्यता वाढली आहे. हे संबंध सुधारणे अशक्य नसले तरी त्यासाठी अनेक वर्षे लागतील आणि नजीकच्या भविष्यात ते शक्य दिसत नाही.
advertisement
क्वाड आणि पाश्चिमात्य देशांची चिंता
अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी मिळून तयार केलेल्या क्वाडला चीनचा आशियातील वाढता प्रभाव कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. SCO मध्ये भारताची वाढती सक्रियता आणि पुतिन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची उपस्थिती क्वाडच्या रणनीतीला कमकुवत करू शकते. चीन भारतासाठी सर्वात मोठा धोका आहे, असे पश्चिम देश भारताला नेहमी सांगत आले आहेत. पण आता भारताचा रशिया आणि चीन या दोन्ही देशांसोबत व्यासपीठ शेअर करणे चिंता वाढवणारे आहे, असेही बोल्टन म्हणाले.
advertisement
बोल्टन आणि ट्रम्प यांच्यातील वाद
जॉन बोल्टन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध दीर्घकाळापासून तणावपूर्ण आहेत. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात बोल्टन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. पण नंतर त्यांच्यात तीव्र मतभेद झाले. बोल्टन यांनी 'द रूम व्हेअर इट हॅपन्ड' (The Room Where It Happened) नावाचे पुस्तक लिहिले. ज्यात त्यांनी ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी पात्र नाही असे म्हटले होते. बोल्टन यांच्या घर आणि कार्यालयावर नुकतीच एफबीआयने (FBI) छापे टाकले होते, जे गोपनीय कागदपत्रांशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
भारताची स्वतंत्र परराष्ट्र धोरण
भारत सध्या स्वतंत्र आणि बहुध्रुवीय परराष्ट्र धोरण (independent and multipolar foreign policy) अवलंबत आहे. एकीकडे तो क्वाडमध्ये अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसोबत आहे. तर दुसरीकडे SCO मध्ये रशिया आणि चीनसोबतही समन्वय साधत आहे. हाच समतोल भारताच्या मुत्सद्देगिरीचे वैशिष्ट्य आहे. पण यामुळे अमेरिकेचे रणनीतिकार अनेकदा अस्वस्थ होतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Shockwaves In America: ट्रम्प यांच्याकडून मोठी चूक, वाईट बातमी आली; मोदींच्या एका निर्णयाने अमेरिकेत अस्वस्थता
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement