पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका पाकिस्तानी बहिणीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, जिंकली सर्वांची मनं!
- Published by:Sachin S
Last Updated:
पंतप्रधान मोदींची पाकिस्तानी बहीण कमर मोहसीन शेख देखील दरवर्षी त्यांना आठवणीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देते.
नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जगभरातील प्रमुख राष्ट्रप्रमुख फोनवरून आणि सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर नंतर एका पाकिस्तानी बहिणीने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हो, कमर मोहसीन शेख असं बहिणीचं नाव आहे. ही पाकिस्तानी महिला दरवर्षी पंतप्रधान मोदींना राखी बांधते आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. भारताचे पाकिस्तानशी संबंध चांगले नसले तरी, ही पाकिस्तानी महिला मोदींना आपला भाऊ मानते.
पंतप्रधान मोदींना पाच भाऊ आणि एक बहीण आहे. पण, पंतप्रधान मोदींची पाकिस्तानी बहीण कमर मोहसीन शेख देखील दरवर्षी त्यांना आठवणीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. शेख पाकिस्तानी असूनही तिने एका भारतीयाशी लग्न केलं आणि अहमदाबादमध्ये स्थायिक झाली. पंतप्रधान मोदींची ही पाकिस्तानी बहीण गेल्या ३० वर्षांपासून त्यांना राखी बांधत आहे. असंही म्हटलं जातंय की, जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही ही पाकिस्तानी बहीण दिल्लीत येऊन पंतप्रधान मोदींना राखी बांधत होती.
advertisement
कोण आहे कमर मोहसीन शेख?
कमर मोहसीन शेख ही महिला कराची येथील एका मुस्लिम कुटुंबातील आहेत. १९८१ मध्ये लग्न झाल्यानंतर ती अहमदाबादला राहायला गेली. कमर शेख पहिल्यांदा पंतप्रधान मोदींना भेटली जेव्हा ते स्वयंसेवक होते, म्हणजेच आरएसएसचा भाग होते. कमरने एका मुलाखतीत सांगितलं की, ती पहिल्यांदा पंतप्रधान मोदींना आरएसएसमध्ये असताना भेटली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कमर शेख यांनी १९९० मध्ये अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान मोदींना गुजरातचे तत्कालीन राज्यपाल स्वरूप सिंग यांच्यासोबत पाहिलं. सिंग यांनी मोदींना सांगितलं की, ते कमर शेखला त्यांची मुलगी मानतात. हे सांगितल्यावर नरेंद्र मोदी म्हणाले की, मग कमर शेख त्यांची बहीण झाली. तेव्हापासून, कमर दरवर्षी पंतप्रधान मोदींना राखी बांधायला विसरत नाही.
advertisement
एक पाकिस्तानी बहीण बांधते PM मोदींना राखी
१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशातील धार इथं "स्वस्थ नारी सशक्त परिवार" मोहिमेत भाग घेतला. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ८ वा राष्ट्रीय पोषण महिना, आदी कर्मयोगी अभियान आणि सुमन सखी चॅटबॉट सुरू केला. "स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान" अंतर्गत, ७५,००० आरोग्य शिबिरं सुरू करण्यात आली आहेत, जी २ ऑक्टोबरपर्यंत चालतील आणि महिला आणि मुलांच्या पोषण, जागरूकता आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करतील. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देशातील माता आणि भगिनींना विशेष प्रार्थना देखील केली. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून आणि जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
advertisement
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान यांनीही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडा, कला आणि राजकीय क्षेत्रातील असंख्य व्यक्तींनी मोदींना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस खास बनवला. पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान सरकारकडून नसले तरी, एका पाकिस्तानी बहिणीने पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देऊन त्यांचे मन जिंकले.
Location :
Delhi,Delhi
First Published :
September 17, 2025 5:23 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पंतप्रधान नरेंद्र मोदींना एका पाकिस्तानी बहिणीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, जिंकली सर्वांची मनं!