POK Protest: पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानी सैन्याचं सैतानी कृत्य, आतापर्यंत 12 जणांना ठार मारलं

Last Updated:

मुझफ्फराबादसह देशाच्या अनेक भागात पाकिस्तानविरोधी निदर्शनं सुरू आहेत. आतापर्यंत जमावावर झालेल्या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

News18
News18
पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. मुझफ्फराबादसह देशाच्या अनेक भागात पाकिस्तानविरोधी निदर्शनं सुरू आहेत. आतापर्यंत जमावावर झालेल्या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात जखमींना प्राथमिक उपचाराशिवाय रुग्णालयात वेदनेने तडफडताना दाखवण्यात आले आहे.
संयुक्त अवामी कृती समितीने (JAAC) एक निवेदन जारी केले आहे ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्य आणि रेंजर्सवर क्रूरतेचा आरोप केला आहे.  इंटरनेट बंद आणि सैन्यानं केलेल्या हिंसाचारामुळे हा प्रदेश पूर्णपणे अंधारात पडला आहे. हा मुद्दा आता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद (UNHRC) आणि ब्रिटिश संसदीय समितीमध्ये मांडलाआहे.
 1."आझाद काश्मीर" चा खोटा मुखवटा
पीओकेमधील स्थानिक नेत्यांनी उघडपणे पाकिस्तानवर हल्ला केला आहे. संयुक्त अवामी कृती समितीचे शौकत नवाज मीर म्हणाले, "ते स्वतःच्या मुलांना मारत आहे. राज्य स्वतःच्या लोकांना मारण्यात व्यस्त आहे." दुसऱ्या नेत्यानं म्हटलं आहे की, "आझाद काश्मीर मुक्त नाही." हे नेते म्हणतात की, पाकिस्तान आपल्या सैन्याचा वापर करून काश्मिरींना गुलाम बनवू इच्छित आहे, त्यांचे हक्क हिरावून घेत आहे.
advertisement
२. मुझफ्फराबादच्या रस्त्यांवर घोषणाबाजी 
"मारेकरींनो, उत्तर द्या, तुमच्या रक्ताचा हिशोब द्या." पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादमध्ये रविवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले. पोलीस आणि रेंजर्सच्या गोळीबारात ८ निदर्शक जागीच ठार झाले. यामुळे जमाव आणखी संतप्त झाला, त्यांनी "मारेकरींनो, उत्तर द्या, तुमच्या रक्ताचा हिशोब द्या" असे घोषणा दिल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये जखमी पाकिस्तानी रेंजर्स जमिनीवर पडलेले आहेत.
advertisement
३. इंटरनेट ब्लॅकआउट
रविवारपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये इंटरनेट आणि फोन सेवा बंद करण्यात आल्या आहेत. युकेपीएनपी नेते सरदार नासिर अझीझ खान यांनी जिनेव्हा येथे झालेल्या यूएनएचआरसीच्या ६० व्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, ३० लाख काश्मिरी वेढ्यात आहेत, त्यांच्याकडे इंटरनेट नाही, फोन नाही आणि मीडियाची सुविधा नाही. हे लोक शस्त्रे उचलत नाहीत, ते फक्त त्यांचे मूलभूत हक्क मागत आहेत. पाकिस्तान गोळ्या आणि लाठ्यांनी प्रत्युत्तर देत आहे.
advertisement
४. ब्रिटिश संसदीय समितीनेही उठवला आवाज
ब्रिटनच्या सर्वपक्षीय संसदीय गटाने (एपीपीजी) एफसीडीओला पत्र लिहून पीओकेमधील बिघडत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. खासदार इम्रान हुसेन यांनी म्हटलं की, संपर्क बंदीमुळे त्यांच्या मतदारसंघातील मतदार त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकले नाहीत. एपीपीजीने पाकिस्तानच्या कृतींना "गंभीर मानवाधिकार उल्लंघन" म्हणून वर्णन केले आणि ब्रिटिश सरकारला दबाव आणण्याचे आवाहन केले.
advertisement
५. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरुद्ध वाढला दबाव
जिनेव्हा ते लंडनपर्यंत पीओकेची वेदना जाणवत आहे. स्वित्झर्लंडमधील यूकेपीएनपीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, पाकिस्तान काश्मिरींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ते शांततेने लढत आहेत. काश्मिरी वंशाच्या ब्रिटिश नागरिकांनीही ब्रिटनमधील पाकिस्तानी दूतावासाबाहेर निदर्शने केली आणि "खून्यांना उत्तर द्या!" अशा घोषणा दिल्या.
मराठी बातम्या/विदेश/
POK Protest: पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाकिस्तानी सैन्याचं सैतानी कृत्य, आतापर्यंत 12 जणांना ठार मारलं
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement