रशियाचा धाडसी Attack, अमेरिकेचे फायटर जेट F-16 पाडले; युक्रेनवर एका रात्रीत 537 हल्ले

Last Updated:

F 16 Crash Russia Ukraine: रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला चढवत तब्बल 537 हवाई शस्त्रांचा वापर केला. या हल्ल्यात युक्रेनचा एफ-16 लढाऊ वैमानिक शहीद झाला असून, अनेक नागरिकही जखमी झाले आहेत.

News18
News18
मॉस्को: रशियाने 2022 मध्ये सुरू केलेल्या युक्रेन युद्धाच्या तीन वर्षांच्या काळातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 470 पेक्षा अधिक ड्रोन आणि 60 विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. या हल्ल्यात युक्रेनचा एक एफ-16 लढाऊ वैमानिक ठार झाला.
युक्रेनच्या हवाई दलानुसार, रशियाने एकूण 537 हवाई शस्त्रांचा वापर केला. ज्यामध्ये 477 ड्रोन आणि डिकॉइज तसेच 60 क्षेपणास्त्रे होती. यामधील 249 शस्त्रं पाडण्यात यश आलं असून, 226 शस्त्रं हरवली गेली. जी कदाचित इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमुळे निष्क्रिय झाली. एफ-16 लढाऊ विमान पाडण्यात आलं आणि त्यातील वैमानिकाचा मृत्यू झाला.
युक्रेनच्या हवाई दलाचे संप्रेषण प्रमुख युरीय इह्नात यांनी Associated Press ला सांगितले की, हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला होता. खेरसॉनमध्ये, प्रादेशिक गव्हर्नर ओलेक्झांडर प्रोकेडिन यांनी सांगितले की ड्रोन हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाली. तर चेरकासीमध्ये प्रादेशिक गव्हर्नर इहोर टाबुरेट्स यांच्या माहितीनुसार, एका लहान मुलासह सहा जण जखमी झाले.
advertisement
"X" या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले, संपूर्ण रात्रभर युक्रेनमध्ये एअर रेड अलर्ट वाजत होते — 477 ड्रोन आमच्या आकाशात होते. त्यापैकी बहुतेक रशियन-इराणी ‘शाहेद’ ड्रोन होते. तसेच 60 प्रकारांची क्षेपणास्त्रं होती. रशियन सैन्याने जीवन टिकवून ठेवणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष्य साधलं.
दुर्दैवाने हा हल्ला परतवत असताना आमचा एफ-16 वैमानिक मॅक्सीम उस्तायमेंको याचा मृत्यू झाला. त्याने आज सात हवाई लक्ष्यांचा नाश केला. त्याच्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना माझ्या संवेदना. त्याच्या मृत्यूच्या सर्व बाबींची चौकशी करण्याचे मी आदेश दिले आहेत. युक्रेनी हवाई दल आमचं आकाश शौर्याने वाचवत आहे. युक्रेनचे संरक्षण करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो, असे त्यांनी पुढे नमूद केले.
advertisement
झेलेन्स्की यांनी सांगितले की एका मुलाला जखमी करण्यात आले असून रशियावर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचे आवाहन केले. फक्त याच आठवड्यात 114 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रं, 1 हजार 270 पेक्षा अधिक ड्रोन आणि जवळपास 1,100 ग्लाईड बॉम्ब्स यांचा वापर झाला आहे. शांततेच्या आवाहनांकडे दुर्लक्ष करून पुतिनने खूप आधीच युद्ध चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
advertisement
हे हल्ले त्यानंतर झाले जेव्हा रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्तंबूलमध्ये थेट शांतता चर्चेची नवीन फेरी घेण्याची तयारी दर्शवली. मात्र युद्ध शांत होण्याची चिन्हं अजूनही दिसत नाहीत कारण अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय शांतता प्रयत्नांमध्ये अद्याप कोणताही ठोस यश मिळालेला नाही. इस्तंबूलमध्ये रशियन आणि युक्रेनियन प्रतिनिधींच्या दोन अलीकडील फेऱ्या लवकरच संपल्या आणि कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
रशियाचा धाडसी Attack, अमेरिकेचे फायटर जेट F-16 पाडले; युक्रेनवर एका रात्रीत 537 हल्ले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement