दिसेल त्याला ठोकलं! रस्त्यावर रक्त अन् मृतदेहांचा खच, दक्षिण आफ्रिकेत अंदाधुंद गोळीबार, 12 जणांचा मृत्यू

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेतील बेकरसडाल टाउनशिपमध्ये अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू, 10 जखमी तर प्रिटोरियाजवळील सोल्सविले टाउनशिपमध्येही अशाच प्रकारची घटना घडली.

News18
News18
दिसेल त्याला ठोकलं, रस्त्यावर रक्ताचा सडा आणि मृतदेह पडले होते. रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत आणि जीव वाचवण्यासाठी लोक ओरडत होते. ही घटना आहे दक्षिण आफ्रिकेतील, अंदाधुंद झालेल्या गोळीबारात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा हिंसाचाराची लाट उसळली आहे.
रविवारी जोहान्सबर्गजवळील बेकरसडल टाउनशिपमध्ये झालेल्या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला आणि 10 जण गंभीर जखमी झाले. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या आणखी एका अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाल्याने आता देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, जोहान्सबर्गच्या नैऋत्येस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेकर्सडाल परिसरात ही घटना घडली.
advertisement
परवान्याशिवाय चालणाऱ्या एका बारजवळ झाला. अचानक अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्यावर असलेल्या लोकांवर गोळीबार केला. कोणतंही कारण नसताना काही निष्पाप लोकांना टार्गेट करण्यात आलं. गौतेंग प्रांतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी पुढे सांगितले की मृत कोण आहेत किंवा त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
advertisement
पोलिसांनी सांगितले की हल्ल्याचा हेतू अजून अस्पष्ट आहे आणि कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हे ठिकाण सोन्याच्या खाणींजवळ आहे, तपास अजूनही हा हल्ला खाणकामांशी किंवा गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित आहे की नाही याबाबत सध्या चौकशी सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत ही दुसरी घटना घडली आहे. याआधी 7 डिसेंबर रोजी प्रिटोरियाजवळील सोल्सविले टाउनशिपमध्ये एका वसतिगृहात गोळीबार झाला होता. त्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलासह 11 लोक ठार झाले आणि 14 जण जखमी झाले होते.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
दिसेल त्याला ठोकलं! रस्त्यावर रक्त अन् मृतदेहांचा खच, दक्षिण आफ्रिकेत अंदाधुंद गोळीबार, 12 जणांचा मृत्यू
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement