Pakistani Spy In India: गद्दार ज्योतीसाठी धावून आली पाकिस्तानी बहीण, देशद्रोहाचं चकित करणारे कनेक्शन समोर
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ज्योतीच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल करण्यासाठी पाकिस्तानी इन्फ्लूएन्सर तिची मदत करत होते
Jyoti Malhotra Spy Case: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर ज्योतीची मानलेली पाकिस्तानी बहीण तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. पाकिस्तानी पत्रकार आणि सोशल मीडिया इनफ्लुएंसर हिरा बतूल हिने सोशल मीडियावर पोस्ट करत ज्योतीच्या अटकेला विरोध केला आहे. याशिवाय ज्योतीचं नाव न घेता बतूलने भारत सरकारवर निशाणा साधला आहे.
भारत सरकार यूट्यूबर्सला टार्गेट करत असल्याचा आरोप हिराने केलाय. ज्योती मल्होत्रा काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये हिरा बतूलला भेटली होती. त्यावेळी ज्योतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एकमेकांना बहीण असल्याचे सांगितले होते.
भारताची अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत
पाकसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केलीय. तिच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येतेय. ज्योती मल्होत्राचं पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि पत्रकारांशीही संबंध होते. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ज्योती भारताची अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवत होती. ही गोपनीय माहिती ती आयएसआय पर्यंत ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे पोहोचवत होती.
advertisement
पहलगाम हल्ल्याच्या पोस्टमध्ये नेमकं काय?
ज्योती मल्होत्रा ने पहलगाम हल्ल्याच्या संदर्भातही सोशल मीडियावर पोस्ट केली होतीय. यामध्ये ती दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करते मात्र या हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा कुठलाही उल्लेख ती करत नाही. तर दुसरीकडे तिची मानलेली बहीण हीरा बतूल अटारी-वाघा बॉर्डवरील भारतीय सुरक्षा चौकी दाखवत असल्याचं दिसून येतं आहे.
advertisement
पोस्ट व्हायरल करण्यासाठी पाकिस्तानी इन्फ्लूएन्सर करायची मदत
ज्योतीच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल करण्यासाठी पाकिस्तानी इन्फ्लूएन्सर तिची मदत करत होते अशी माहिती समोर आलीय. ज्योतीने जम्मू आणि काश्मीरला जोडणाऱ्या कांजीकुंड परिसराचा फोटो शेअर केला तेव्हा हा संशय आणखी वाढला. पाकिस्तानातील लोकांनीही या पोस्टवर कमेंट केल्यात. कांजीकुंड हा एक अतिशय संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो..
Location :
Delhi
First Published :
May 19, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Pakistani Spy In India: गद्दार ज्योतीसाठी धावून आली पाकिस्तानी बहीण, देशद्रोहाचं चकित करणारे कनेक्शन समोर