चीनचा भारताविरुद्ध मोठा कट, बांगलादेशमध्ये संशयास्पद हालचाली; देशाच्या सीमेवर सुरू आहे धोकादायक खेळी!

Last Updated:

Bangladesh Against India : भारत-पाकिस्तान तणावानंतर चीन बांगलादेशमधील लालमोनिरहाट विमानतळ पुन्हा सुरू करण्यासाठी मदत करत आहे. हे विमानतळ भारताच्या सीमेपासून 12-15 किमी अंतरावर आहे.

News18
News18
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर आता चीनकडून चिंता वाढवणाऱ्या हालचाली समोर येत आहेत. चीन बांगलादेशमधील एक बंद पडलेले विमानतळ पुन्हा सुरू करण्यासाठी मदत करण्याची योजना आखत आहे. हे विमानतळ लालमोनिरहाट येथे आहे. जे भारताच्या सीमेपासून केवळ 12-15 किलोमीटर अंतरावर आहे. चीनच्या काही अधिकाऱ्यांनी नुकतेच या जागेला भेट दिली आहे. हे विमानतळ बांगलादेशच्या हवाई दलाच्या नियंत्रणाखाली आहे, परंतु सध्या ते बंद आहे.
बांगलादेशने चीनकडे हे विमानतळ पुन्हा सुरू करण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. हे विमानतळ 'चिकन नेक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरपासून 135 किलोमीटर दूर आहे. हा कॉरिडॉर भारताला ईशान्येकडील राज्यांशी जोडणारा एक अरुंद मार्ग आहे. मात्र हे विमानतळ सामान्य लोकांसाठी वापरले जाईल की सैन्यासाठी हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु भारत-बांगलादेश सीमेजवळ चीनची उपस्थिती या कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी चिंतेची बाब ठरू शकते.
advertisement
चीनचे हे पाऊल चिंताजनक का?
चीनची ही पहल चिंताजनक आहे. कारण अलीकडेच बांगलादेशचे अंतरिम नेते मोहम्मद युनूस यांनी चीनला भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये आपली आर्थिक उलाढाल वाढवण्यास सांगितले होते. युनूस यांच्या या विधानामुळे भारताची चिंता वाढली आहे. चीन वारंवार अरुणाचल प्रदेशावर आपला दावा करत असतो आणि तेथील ठिकाणांची नावे बदलत असतो, हे देखील या चिंतेचे कारण आहे.
advertisement
1958 मध्ये काही काळासाठी सुरू होते विमानतळ
खरं तर लालमोनिरहाट विमानतळ 1931 मध्ये ब्रिटिशांनी बांधले होते. दुसऱ्या महायुद्धात हे मित्र राष्ट्रांच्या सैन्यासाठी एक महत्त्वाचे विमानतळ होते. येथून ते दक्षिण पूर्व आशियातील आपल्या लष्करी कारवाया करत होते. फाळणीनंतर पाकिस्तानने 1958 मध्ये काही काळासाठी ते नागरी विमानसेवेसाठी सुरू केले होते. त्यानंतर ते बंद पडले. हे विमानतळ 1,166 एकरमध्ये पसरलेले आहे. यात 4 किलोमीटर लांबीचा रनवे, एक मोठा टरमेक, एक हँगर आणि एक टॅक्सीवे आहे. 2019 मध्ये शेख हसीना यांच्या सरकारने येथे बंगबंधू शेख मुजीबुर रहमान एव्हिएशन अँड एरोस्पेस युनिव्हर्सिटी बनवण्याची घोषणा केली होती. ही एव्हिएशन अकादमी बांगलादेशच्या हवाई दलाद्वारे चालवली जाते.
advertisement
युनूस यांच्या चीन दौऱ्यात 2.1 अब्ज डॉलरची मदत
फेब्रुवारी 2025 मध्ये युनूस यांच्या अंतरिम सरकारने लालमोनिरहाटसह ब्रिटिशांच्या काळातील 6 विमानतळ पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घेण्यात आला होता. लालमोनिरहाट व्यतिरिक्त, ईश्वरदी (पबना), ठाकुरगाव, शमशेरनगर (मौलवीबाजार) आणि बोगरा येथेही विमानतळ पुन्हा सुरू करण्याची योजना आहे.
advertisement
आम्ही अडकलोय… वाचवा! पंकज मोदींचा अखेरचा कॉल; मदतीसाठी केला शेवटचा आक्रोश
लालमोनिरहाट विमानतळ प्रकल्प चीनच्या 2.1 अब्ज डॉलरच्या गुंतवणूक, कर्ज आणि अनुदानाचा भाग आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे गुंतवणूक, कर्ज आणि अनुदान ढाकाला युनूस यांच्या मार्चमधील चीन दौऱ्यात मिळाले होते. सिलिगुडी कॉरिडॉरजवळ असल्याने चीन लालमोनिरहाट विमानतळाबाबत विशेष उत्सुक आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
चीनचा भारताविरुद्ध मोठा कट, बांगलादेशमध्ये संशयास्पद हालचाली; देशाच्या सीमेवर सुरू आहे धोकादायक खेळी!
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement