इस्रायल-इराण युद्ध सुरू असताना अमेरिकेत खळबळ, महिला स्पीकरसह पतीची हत्या; सिनेटर हॉफमन यांनाही गोळ्या घातल्या

Last Updated:

Two US Lawmakers shot: अमेरिकेतील मिनेसोटा राज्यात दोन प्रमुख लोकप्रतिनिधींवर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आणि माजी स्पीकर मेलिसा हॉर्टमन यांच्यासह त्यांच्या पतीचा मृत्यू झाला असून, सिनेटर जॉन हॉफमन आणि त्यांच्या पत्नीवरही अनेक गोळ्या झाडण्यात आल्या.

News18
News18
वॉशिंग्टन: अमेरिकेतील चॅम्पलिन आणि ब्रुकलिनमध्ये रात्रीच्या सुमारास दोन लोकप्रतिनिधींवर गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. या गोळीबाराच्या पहिल्या घटनेत प्रतिनिधी मेलिसा हॉर्टमन आणि त्यांचे पती ठार झाले आहेत. तर दुसऱ्या घटनेत सिनेटर जॉन हॉफमन जखमी झाले आहेत.
या हल्ल्यात मेलिसा हॉर्टमन आणि त्यांचे पती ठार झाल्याच्या वृत्ताला गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी दुजोरा दिला. राज्याचे सिनेटर जॉन हॉफमन आणि त्यांच्या पत्नी यांनाही गोळ्या लागल्या असून हॉफमन जखमी झाल्याचे वृत्त आहे. मिनियापोलिसच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या निवासस्थानांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या.
अल्पवयीन मुलाने शूट केलेल्या Videoचे धक्कादायक सत्य, थरकाप उडवणारी क्लिप व्हायरल
Fox News ने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात असल्याचा संशय आहे. हॉर्टमन या ब्रुकलिन पार्क येथील डेमोक्रॅट पक्षाच्या आमदार असून त्या डिस्ट्रिक्ट 34B चे प्रतिनिधीत्व करत होत्या. तर जॉन हॉफमन, चॅम्पलिन येथील डेमोक्रॅट सिनेटर, सिनेट डिस्ट्रिक्ट 34 चे प्रतिनिधी आहेत. दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या. हॉफमन व त्यांच्या पत्नीवर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या, मात्र त्यांचे प्राण वाचल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी ही एक "राजकीय हेतूने केलेली हत्या" असल्याचे सांगितले. हॉर्टमन हे राज्य चांगले बनवण्यासाठी झटत होती, असे भावनिक उद्गार वॉल्झ यांनी काढले.
तेहरान जळून खाक होईल- इराणने अमेरिका,ब्रिटनला धमकी दिल्याने इस्रायलचा मोठा इशारा
हॉर्टमन आणि हॉफमन हे दोघेही मिनेसोटा डेमोक्रॅटिक-फार्मर-लेबर पार्टीचे सदस्य होते. हॉर्टमन या 2019 ते 2025 या कालावधीत स्पीकर ऑफ द हाऊस होत्या. तसेच त्या मृत्यूपूर्वी DFL लीडर म्हणून काम करत होत्या, असे Minnesota Legislature Reference Library ने सांगितले.
advertisement
गंभीर परिस्थिती
या घटनेनंतर मिनेसोटामध्ये आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. गव्हर्नर वॉल्झ यांनी X वर लिहिले की, मी आज सकाळी चॅम्पलिन आणि ब्रुकलिन पार्कमध्ये झालेल्या टार्गेटेड शूटींगबाबत माहिती घेतली आहे. पुढील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले, मी राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटर सक्रिय केले आहे. स्थानिक पोलीस यंत्रणांना राज्याचे सर्व संसाधन उपलब्ध करून दिले आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
advertisement
ब्रुकलिन पार्क पोलिस विभागाने सकाळी 5:30 वाजता एडिनबर्ग गोल्फ कोर्सच्या 3 मैल परिसरात शेल्टर-इन-प्लेस अलर्ट जारी केला. आरोपी अजूनही फरार असून तो पोलिसाचा वेश घालून फिरत असल्याचा संशय आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तो एक गोऱ्या वर्णाचा पुरुष असून, त्याचे केस तपकिरी रंगाचे आहेत. तो निळ्या रंगाचा शर्ट व पँट घालून, त्यावर काळे आर्मर घालून फिरतो आहे.
advertisement
माऊंड्स व्ह्यूचे महापौर झॅक लिंडस्ट्रॉम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना मिळालेल्या सेफ्टी अलर्टमुळेच ही माहिती समजली. मला कधी वाटले नव्हते की आपल्यावर अशा परिस्थितीत येऊ. माझ्या प्रार्थना हॉर्टमन आणि हॉफमन कुटुंबीयांसोबत आहेत. ही गोष्ट मान्य केली जाऊ शकत नाही – निवडून आलेल्या लोकांवर हिंसाचार हा कधीही योग्य नाही.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इस्रायल-इराण युद्ध सुरू असताना अमेरिकेत खळबळ, महिला स्पीकरसह पतीची हत्या; सिनेटर हॉफमन यांनाही गोळ्या घातल्या
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement