तोपर्यंत आम्ही हल्ला करणार नाही, चीनचा ट्रम्प यांना शब्द; जागतिक राजकारणात सस्पेन्स वाढवणारा खुलासा

Last Updated:

US-China Relations: अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, शी जिनपिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात तैवानवर हल्ला करणार नाही असे गुप्त आश्वासन दिले होते. या खुलाशामुळे अमेरिका-चीन संबंधांवर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

News18
News18
अलास्का : जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आहेत. तोपर्यंत चीन तैवानवर हल्ला करणार नाही, असे आश्वासन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिल्याचा दावा ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना केला आहे. ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची आठवण करून देत संयम राखण्याचे वचन मिळाल्याचे सांगितले.
जिनपिंग मला म्हणाले, जोपर्यंत तुम्ही (ट्रम्प) राष्ट्राध्यक्ष आहात, तोपर्यंत मी हे कधीही करणार नाही. मी त्याचे कौतुक करतो. पण ते असेही म्हणाले, मी खूप संयमी आहे आणि चीन खूप संयमी आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, हे आश्वासन जून महिन्यातील एका फोन कॉलदरम्यान मिळाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये आपला दुसरा कार्यकाळ सुरू केल्यापासून दोन्ही नेत्यांमधील हे पहिलेच पुष्टी झालेले संभाषण आहे. यापूर्वी त्यांनी एप्रिलमध्ये आणखी एका फोन कॉलचा उल्लेख केला होता, परंतु त्याचे तपशील दिले नव्हते.
advertisement
चीन तैवानला आपला एक बंडखोर प्रांत मानतो आणि गरज पडल्यास बळाचा वापर करून त्याला आपल्या नियंत्रणाखाली आणण्याची शपथ घेतली आहे. तैवानने बीजिंगचे सार्वभौमत्वाचे दावे फेटाळले असून केवळ तेथील लोकच आपले भविष्य ठरवू शकतात, असे म्हटले आहे.
प्रश्नांना उत्तर देताना वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाने पुन्हा एकदा सांगितले की- तैवान हा अमेरिका-चीन संबंधांमधील "सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा" आहे. दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू यांनी अमेरिकेला ‘वन-चायना’ (one-China) तत्त्वाचे पालन करण्याचे तैवान संबंधित बाबी काळजीपूर्वक हाताळण्याचे आणि तैवान सामुद्रधुनीमध्ये स्थिरता राखण्याचे आवाहन केले.
advertisement
जरी अमेरिका तैवानचा प्रमुख शस्त्र पुरवठादार आणि राजकीय समर्थक असला तरी त्याचे तैवानसोबत कोणतेही औपचारिक राजनैतिक संबंध नाहीत.
ट्रम्प यांच्या वक्तव्यावर तैवानच्या सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (Democratic Progressive Party) ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ वांग टिंग-यू यांनी फेसबुकवर लिहिले की- तैवान मित्रराष्ट्रांच्या समर्थनाचे स्वागत करत असले तरी, सुरक्षा ही शत्रूच्या आश्वासनावर किंवा केवळ मित्रांच्या मदतीवर अवलंबून असू शकत नाही. आपली स्वतःची संरक्षण क्षमता मजबूत करणे हेच मूलभूत आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
तोपर्यंत आम्ही हल्ला करणार नाही, चीनचा ट्रम्प यांना शब्द; जागतिक राजकारणात सस्पेन्स वाढवणारा खुलासा
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement