ट्रम्प यांचे Secret Documents 'वॉशिंग्टन पोस्ट'च्या हाती, Tariff गेमचा पर्दाफाश; भारत हिट लिस्टवर, संपूर्ण जगाची झोप उडाली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Trump Tariffs: अमेरिकेच्या गुप्त दस्तऐवजांनी ट्रम्प प्रशासनाचा टॅरिफ गेम उघड केला आहे. व्यापार युद्धाच्या आडून भारतावर आर्थिक व राजनैतिक दबाव टाकण्याची ही सनसनाटी योजना होती.
नवी दिल्ली/वॉशिंग्टन: ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणांसंबंधी समोर आलेल्या अमेरिकन सरकारी दस्तऐवजांमुळे भारत आणि इतर अनेक देशांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालानुसार डोनाल्ड ट्रंप यांनी आयात शुल्काचा वापर केवळ व्यापार तूट कमी करण्यासाठीच नाही तर धोरणात्मक दबावाचे एक हत्यार म्हणून केला होता. यात लष्करी तैनाती, संरक्षण खरेदी आणि काही खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी अटी जोडण्यात आल्या होत्या.
ट्रम्प प्रशासनाने अनेक देशांकडून असे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जे सहसा व्यापार कराराचा भाग नसतात. उदाहरणार्थ- दक्षिण कोरियाला अमेरिकन सैन्याच्या तैनातीमध्ये बदलांना पाठिंबा देण्यास, चीनला रोखण्यासाठी संरक्षण खर्च वाढवण्यास आणि अमेरिकन लष्करी हार्डवेअर खरेदी करण्यास सांगितले होते. इतकेच नाही तर इस्रायलवर हैफा बंदरातून चीनी कंपनीचे नियंत्रण काढून टाकण्यासाठी दबाव आणला गेला होता.
advertisement
भारताला कसे बनवले होते लक्ष्य?
भारतालाही थेट लक्ष्य करण्यात आले होते. ट्रंप यांनी 50% टॅरिफ लावण्याची धमकी दिली. जेणेकरून नवी दिल्ली रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करेल. रशियाला मिळणारे उत्पन्न युक्रेन युद्धाला प्रोत्साहन देते, असा अमेरिकेचा युक्तिवाद होता. या खुलाशावरून हे स्पष्ट होते की- वॉशिंग्टन आपला व्यापारी दबाव भू-राजकीय अजेंड्याशी जोडून वापरत होता.
advertisement
प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तैवान, भारत आणि इंडोनेशियासह अनेक देशांवर आपला संरक्षण खर्च वाढवण्यासाठी किंवा अधिक अमेरिकन लष्करी हार्डवेअर खरेदी करण्यासाठी दबाव टाकण्याची योजना आखली होती.
Exclusive: President Trump’s use of tariffs may have been more extensive than was publicly known.
Internal government documents obtained by The Post encompass an array of national security goals as well as the interests of individual companies. https://t.co/7gHR9s52bx pic.twitter.com/xACXfGoaUe
— The Washington Post (@washingtonpost) August 9, 2025
advertisement
निवडक अमेरिकन कंपन्यांना फायदा!
ट्रम्प प्रशासनाचे लक्ष केवळ सुरक्षा बाबींवर नव्हते, तर काही अमेरिकन कंपन्यांच्या हितांवरही होते. उदाहरणार्थ, आफ्रिकन देश लेसोथोला स्टारलिंकला कोणत्याही फिजिकल ऑफिसशिवाय काम करण्याची परवानगी देण्यास आणि एका अमेरिकन रिन्यूएबल एनर्जी कंपनीला कर सवलत देण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे इस्रायलला शेवरॉनच्या गॅस प्रकल्पात हस्तक्षेप न करण्याची ताकीद दिली होती.
advertisement
या रणनीती चीनचा प्रभाव रोखण्यावरही केंद्रित होत्या. कंबोडियामध्ये अमेरिकन नौदलाच्या वार्षिक भेटीची अट ठेवण्यात आली होती. मॉरिशसला त्यांच्या नेटवर्कमधून हुवावे आणि ZTE सारख्या चीनी कंपन्यांची उपकरणे काढून टाकण्यास सांगितले होते. अर्जेंटिनामध्ये चीनी स्पेस इन्स्टॉलेशनवर नियंत्रण उपाय लागू करण्याची चर्चा झाली होती.
भारतासाठी याचा संदेश स्पष्ट आहे. अमेरिकेचे टॅरिफ युद्ध आता केवळ व्यापार नाही, तर राजनैतिक दबावाचे हत्यार बनले आहे. जर वॉशिंग्टन आपल्या हितांसाठी अशा प्रकारच्या उपाययोजना करत असेल तर नवी दिल्लीलाही आपल्या धोरणात्मक भागीदारी आणि व्यापारी करारांकडे अधिक सावधगिरीने पाहावे लागेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 09, 2025 11:10 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
ट्रम्प यांचे Secret Documents 'वॉशिंग्टन पोस्ट'च्या हाती, Tariff गेमचा पर्दाफाश; भारत हिट लिस्टवर, संपूर्ण जगाची झोप उडाली


