80 वर्षांच्या वृद्धावर तरुणीचं जडलं प्रेम, वृद्धाश्रमातून थेट घरीच घेऊन आली, करणार आहे लवकरच लग्न

Last Updated:

अमेरिकेतील 35 वर्षीय टिफनीने वृद्धाश्रमात भेटलेल्या 80 वर्षीय वृद्धावर प्रेम केले. तिचे कुटुंब असमाधानी असून सोशल मीडियावर ती ट्रोल होत आहे. मात्र, ट्रोल्सकडे दुर्लक्ष करत तिने लग्नाचा निर्णय घेतला.

News18
News18
बऱ्याचदा असं म्हटलं जातं की, माणूस प्रेमात आंधळा होतो. प्रेम जात, धर्म, समुदाय पाहत नाही. आता तर वेळ अशी आली आहे की, प्रेम वय आणि लिंगदेखील पाहत नाही. अमेरिकेतील एका तरुणीने हे सिद्ध केले आहे. एका 35 वर्षीय तरुणीची एका वृद्धाश्रमात 80 वर्षीय पुरुषाशी भेट झाली. पहिल्याच भेटीत ती त्याच्या प्रेमात पडली. ती त्याला आपल्या घरी घेऊन आली आणि आता ती त्याच्याशी लग्न करणार आहे. या महिलेला खूप ट्रोल केले जात आहे, पण आता तिला त्याची पर्वा नाही.
टिकटॉकवर प्रेम कहाणी : 'द सन'च्या रिपोर्टनुसार, 35 वर्षीय टिफनी गुडटाइमचे टिकटॉकवर अकाउंट आहे, ज्यावर ती तिच्या जीवनाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. ती टिकटॉकवर तिच्या नात्याबद्दलही बऱ्याच गोष्टी सांगते. टिफनी विस्कॉन्सिनची रहिवासी आहे. ती तिच्या वडिलांच्या वयाच्या पुरुषाच्या प्रेमात आहे. एका व्हिडिओमध्ये टिफनीने सांगितले की, तिला मध्यमवयीन पुरुषच आवडतात.
advertisement
वृद्धाश्रमात झाले प्रेम : काही दिवसांपूर्वी ती एका वृद्धाश्रमात गेली होती, जिथे तिला एक 80 वर्षांचा माणूस दिसला. तो तिला इतका आवडली की हळूहळू ती त्याला भेटू लागली आणि मग त्याला घरी घेऊन आली. दोघेही एकाच घरात राहू लागले आणि आता लवकरच ते लग्न करणार आहेत. टिफनीने सांगितले की, तिच्या या निर्णयाने तिचे कुटुंब फारसे खूश नाही. पण त्यांना त्याची पर्वा नाही.
advertisement
सोशल मीडियावर ट्रोलिंग : एका व्हिडिओमध्ये टिफनी म्हणाली की, तिला वृद्ध लोकांची संगत आवडते. सोशल मीडियावर हजारो लोक तिला फॉलो करतात. पण बहुतेक लोक तिला ट्रोलही करतात. अनेकवेळा लोक म्हणतात की, टिफनी त्या व्यक्तीसोबत फक्त पैशासाठी आहे. त्याचवेळी, अनेक लोक तिला खूप भाग्यवानही मानतात. तथापि, काही लोक असे आहेत जे तिला पाठिंबा देतात. ते म्हणतात की, जर दोघेही एकत्र आनंदी असतील तर त्यांनी इतरांची पर्वा करू नये. एकाने म्हटले की, टिफनी फक्त त्याच्या बँक खात्यावर प्रेम करते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
80 वर्षांच्या वृद्धावर तरुणीचं जडलं प्रेम, वृद्धाश्रमातून थेट घरीच घेऊन आली, करणार आहे लवकरच लग्न
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement