advertisement

तरुणाच्या पोटात निघाले 39 नाणी आणि 37 चुंबक, पाहून डॉक्टरही हैराण!

Last Updated:

जगभरात अनेक धक्कादायक, विचित्र घटना घडत असतात. अशीच एक अजब-गजब घटना समोर आलीय, ज्यामध्ये एका तरुणाच्या पोटातून 39 नाणी आणि 37 चुंबक काढले.

तरुणाच्या पोटात निघाले 39 नाणी आणि 37 चुंबक
तरुणाच्या पोटात निघाले 39 नाणी आणि 37 चुंबक
नवी दिल्ली : जगभरात अनेक धक्कादायक, विचित्र घटना घडत असतात. अशीच एक अजब-गजब घटना समोर आलीय, ज्यामध्ये एका तरुणाच्या पोटातून 39 नाणी आणि 37 चुंबक काढले. ही घटना समोर येताच इंटरनेटवर खळबळ उडवत आहे. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय आणि तरुणाच्या शरीरात एवढी नाणी कशी गेली जाणून घेऊया.
एक तरुण आजारी होता आणि तो मानसिक आजारानं त्रस्त होता. यामुळे त्याला नाणी, चुंबक खाण्याची सवय लागली. 26 वर्षीय तरुणाची ही सवय त्याच्याच जीवावर बेतली आणि शेवटी ऑपरेशन करावं लागलं.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 20 दिवसांपासून त्याला वारंवार उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर कुटुंबीय रुग्णाला रुग्णालयात घेऊन गेले आणि ऑपरेशननंतर त्याच्या पोटातून नाणी आणि चुंबक बाहेर काढण्यात आलं. रुग्णाला सर गंगाराम रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
advertisement
रुग्णाच्या नातेवाइकांनी त्याच्या पोटाचा एक्स-रे काढला, ज्यामध्ये त्याच्या पोटात नाणी आणि चुंबकाच्या आकारात रेडिओ-अपारदर्शक गोष्ट दिसून आली. पोटाच्या सीटी स्कॅनमध्ये असं दिसून आलं की नाणी आणि चुंबकांच्या प्रचंड भारामुळे आतड्यात त्रास निर्माण होत आहे. त्यानंतर तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
advertisement
दरम्यान, दिल्लीतील ही घटना सध्या चांगली व्हायरल होतेय. रुग्णाला त्याच्या शरीरात झिंकची कमतरता असल्याचं समजलं, म्हणून त्यानं 39 नाणी आणि 37 चुंबक गिळले.
view comments
मराठी बातम्या/Viral/
तरुणाच्या पोटात निघाले 39 नाणी आणि 37 चुंबक, पाहून डॉक्टरही हैराण!
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement