Bangalore Video : मळालेले कपडे पाहून शेतकऱ्याला मेट्रोमध्ये चढू दिलं नाही, VIDEO ने खळबळ

Last Updated:

एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका शेतकऱ्याला मळालेले कपडे घातले म्हणून मेट्रोमध्ये चढू दिलं नाही. ही घटना व्हायरल होताच सगळीकडे खळबळ उडाली.

मळालेले कपडे पाहून शेतकऱ्याला मेट्रोत चढू दिलं नाही
मळालेले कपडे पाहून शेतकऱ्याला मेट्रोत चढू दिलं नाही
नवी दिल्ली : दैनंदिन जीवनात अनेक लोक मेट्रोमधून प्रवास करतात. मेट्रोतील अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रोज काहीतरी नवीन घटना मेट्रोमध्ये घडत असते आणि त्याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका शेतकऱ्याला मळालेले कपडे घातले म्हणून मेट्रोमध्ये चढू दिलं नाही. ही घटना व्हायरल होताच सगळीकडे खळबळ उडाली.
बंगळुरुमधून ही धक्कादायक घटना समोर आलीय. एक शेतकरी मेट्रोनं प्रवास करण्यासाठी आला मात्र त्याचे मळालेले कपडे पाहून व्यक्तीला मेट्रोमध्ये चढण्यापासून अडवलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केलाय.
या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धोतर आणि घातलेला एक वृद्ध व्यक्ती मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी आला होता. मात्र एका सुरक्षा पर्यवेक्षकाने गोंधळ घातला आणि वृद्ध व्यक्तीला मेट्रो त्यानंतर या घटनेचा व्हिडिओध्ये चढू दिलं नाही. एका व्यक्तीनं या घटनेचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.
advertisement
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आणि सुरक्षा पर्यवेक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. @DeepakN172 नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून 2 मिनिट 20 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खळबळ माजवतोय. व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं, 'अविश्वसनीय..! मेट्रो फक्त व्हीआयपी लोकांसाठी आहे का? मेट्रो वापरण्यासाठी काही ड्रेस कोड आहे का? राजाजीनगर मेट्रो स्टेशनवर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्तिक सी ऐरानी यांच्या कार्याचे मला कौतुक वाटतं. आम्हाला सर्वत्र असे आणखी नायक हवे आहेत.
advertisement
advertisement
व्हिडीओ शेअर करत वापरकर्त्यानं बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला टॅग केलं आणि लिहिले, 'तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण दिलं पाहिजे'. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून लोकांनी या कृतीवर संताप व्यक्त केलाय.
view comments
मराठी बातम्या/देश/
Bangalore Video : मळालेले कपडे पाहून शेतकऱ्याला मेट्रोमध्ये चढू दिलं नाही, VIDEO ने खळबळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement