5 नाही तर फक्त 2 बोटं; या जमातीतील सगळ्या लोकांचे पाय पक्ष्यांसारखे, यामागचं कारण अजब
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
जन्मापासूनच या लोकांच्या पायाची बोटं जोडलेली असतात, जी शहामृगाच्या पायांसारखी दिसतात. आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो.
नवी दिल्ली : तुम्ही कधी शहामृग पाहिलं आहे का? इंग्रजीमध्ये या प्राण्याला ऑस्ट्रिच म्हणतात. हा खूप मोठा पक्षी आहे आणि सर्वात वेगाने धावणारा पक्षीही आहे. त्यांना उडता येत नाही. त्यांचे पंजे अगदी वेगळे आणि विचित्र असतात. त्यांच्या पायाला फक्त दोन बोटे असतात. पण तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीवर असे काही लोकही आहेत ज्यांचे पाय या शहामृगासारखे आहेत! हे ऐकताच असा प्रश्न पडतो की त्यांचा या पक्षाशी काही संबंध आहे का, की ते कोणत्या आजाराला बळी पडले आहेत? आज आम्ही तुम्हाला या जमातीबद्दल सांगणार आहोत, ज्यातील लोकांना 5 नाही तर केवळ 2 बोटं आहेत.
ब्राइट साइड अँड मीडियम वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, आफ्रिकेच्या उत्तर झिम्बाब्वेमध्ये कायेम्बा नावाचा एक भाग आहे, जिथे वडोमा जमातीचे लोक राहतात. त्यांना डेमा किंवा डोमा असंही म्हणतात. हे लोक त्यांच्या ऑस्ट्रिच फूट सिंड्रोमसाठी ओळखले जातात. विज्ञानाच्या भाषेत याला Ectrodactyly असंही म्हणतात. ही एक प्रकारची अनुवांशिक स्थिती आहे, जी या लोकांमध्ये जन्मापासून असते.
advertisement
या स्थितीला लॉबस्टर क्लॉ सिंड्रोम किंवा टू-टोड सिंड्रोम असंही म्हणतात. जन्मापासूनच या लोकांच्या पायाची बोटं जोडलेली असतात, जी शहामृगाच्या पायांसारखी दिसतात. आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो.
या लोकांना एकांतात राहायला आवडतं. केवळ दोन अंगठे असल्याने त्यांना बूट घालणंही कठीण होतं. याशिवाय चालतानाबी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, हे लोक सहजपणे झाडावर चढतात. हे लोक मानतात की अशा पायांमुळे ते इतर जमातींपेक्षा वरचढ आणि चांगले आहेत. या जमातीतील लोक भटके आहेत आणि शिकार तसंच मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, अवैध शिकारीमुळे या लोकांना आपली शिकारी प्रवृत्ती सोडावी लागली आहे. इतर जमातीच्या लोकांचे पाय त्यांच्यासारखे होऊ नये म्हणून हे लोक त्यांच्या समाजाबाहेर लग्न करत नाहीत.
advertisement
.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 21, 2024 2:37 PM IST
मराठी बातम्या/Viral/
5 नाही तर फक्त 2 बोटं; या जमातीतील सगळ्या लोकांचे पाय पक्ष्यांसारखे, यामागचं कारण अजब


