मृत महिलेला दफन करण्यासाठी खड्डा खोदला; पण पुरण्याआधीच ती उठून हसू लागली, घाबरून बेशुद्ध पडले लोक
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
तिची कबर खोदली गेली आणि तिला आत दफन केले जाणार होते. त्याआधी घरच्यांनी तिला एकदा शेवटचं पाहण्यासाठी शेवपेटी उघडली
नवी दिल्ली : काही घटना अशा असतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. लोक सामान्य भाषेत या घटनांना चमत्कार म्हणतात. असाच एक चमत्कार एका महिलेबाबत घडला. जेव्हा ती स्वतःच्या अंत्यविधीदरम्यान उठून बसली. लोकांना वाटलं ती मेली आहे, पण ती शवपेटीतून हसत बाहेर आली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एसी डनबर नावाच्या महिलेला एपिलेप्सी (झटका) आला होता. तिला मृत घोषित करण्यात आलं. कबर खोदणाऱ्यांनी तिच्यासाठी 6 फूट कबरही खोदली होती आणि त्या महिलेला फक्त दफन करायचं बाकी होतं. दरम्यान, असं काहीतरी घडलं ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
जेव्हा एसी डनबर 30 वर्षांची होती, तेव्हा तिला एपिलेप्टिक फिट आल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. तिला अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईकही आले होते. तिचे कुटुंबीयही दुःखात होते. अखेर तिची कबर खोदली गेली आणि तिला आत दफन केले जाणार होते. त्याआधी घरच्यांनी तिला एकदा शेवटचं पाहण्यासाठी शेवपेटी उघडली. मात्र, शवपेटी उघडताच महिला उठली आणि उठून हसू लागली. यानंतर लोकांना आनंद किंवा दुःख होण्याऐवजी धक्काच बसला. समोर भूत असल्यासारखं त्यांना वाटलं.
advertisement
Buried Alive च्या रिपोर्टनुसार, कबर खोदणारे तीन मजूर इतके घाबरले की ते खालीच पडले. यात त्यापैकी एकाची बरगडी तुटली, त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, तर अन्य दोघं तिथेच बेशुद्ध होऊन पडले. एवढंच नाही तर तिथे जमलेले लोकही पळू लागले.. ही घटना 1915 मध्ये अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे घडली होती. यानंतर महिला 47 वर्षे जगली आणि 1955 मध्ये मरण पावली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 21, 2024 10:40 AM IST
मराठी बातम्या/Viral/
मृत महिलेला दफन करण्यासाठी खड्डा खोदला; पण पुरण्याआधीच ती उठून हसू लागली, घाबरून बेशुद्ध पडले लोक


