जैन संत कपडे का त्यागतात? वेदना होतात, रक्तही येतं, तरीही ते का करतात 'केशलोचन'?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कुटुंब सोडण्यापासून ते अन्नावर नियंत्रण ठेवण्यापर्यंत, तसेच सर्व सुखसोयींचा त्याग करण्यापर्यंत त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. चला या जैन साधूंबद्दल काही गोष्टी जाणून घेऊ.
मुंबई : जैन साधूंबद्दल तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील. अशावेळी त्यांच्याशी संबंधीत बरेच प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. यांपैकी पहिला आणि कॉमन प्रश्न म्हणजे. हे जैन साधू नग्न का असतात? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण थंडी-पावसात देखील ते विना कपडे असतात. एवढंच नाही तर त्यांचं आयुष्य फार कठीण आहे. त्यांना 'केशलोचन' करावं लागतं, जे फारच कठीण काम आहे कारण यामुळे रक्त देखील येतं.
कुटुंब सोडण्यापासून ते अन्नावर नियंत्रण ठेवण्यापर्यंत, तसेच सर्व सुखसोयींचा त्याग करण्यापर्यंत त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. चला या जैन साधूंबद्दल काही गोष्टी जाणून घेऊ.
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबरा असे दोन पंथ आहेत. श्वेतांबर संप्रदायातील भिक्षू पांढरे कपडे घालतात, तर दिगंबर संप्रदायातील भिक्षू हे पूर्णपणे नग्न राहतात. असे मानले जाते की जेव्हा भगवान महावीर ध्यानात इतके मग्न असायचे की त्यांना त्यांच्या शरीरावर देखील लक्ष नव्हतं. तसेच त्यांना शरीराची जाणीव नव्हती, ज्यामुळे ते नग्न रहायचे.
advertisement
दिगंबरा पंथात वस्त्राचा त्याग हा 'अपरिग्रह' या तत्त्वाचा पराक्रम मानला जातो. जैन धर्मानुसार, कपडे व्यवस्थित करणे, त्यांची काळजी आणि साफसफाईसाठी वेळ काढणे, काय परिधान करावे, कसे घालावे हे देखील सांसारिक जीवनाचा एक भाग आहे. ज्यामुळे त्याचा त्याग केला जातो.
जैन ऋषी हे सर्व परिग्रहांपासून वंचित असल्यामुळे ते केवळ मोराच्या पिसांनी बनवलेली पेची स्वत:जवळ ठेवतात, जी केवळ गुप्तांग झाकते. काही जैन साधू मोराची पिसेही ठेवत नाहीत.
advertisement
जैन भिक्षूंचे केस कापण्याची किंवा केस काढण्याची प्रक्रिया सर्वात कठीण मानली जाते. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये जैन संत कात्री, वस्तरा, ब्लेड इत्यादी कोणत्याही साधनांचा वापर न करता डोक्यावरील केस, दाढी, मिशा आणि शरीराच्या इतर भागांचे केस काढतात. ते थेट हातांनी शरीरावरील केस उपटून काढतात, जे खूप वेदनादायी आहे. यामुळे रक्त देखील येतं.
advertisement
दिगंबर जैन यांच्या संत आणि आर्यिकांसाठी (स्त्री साध्वी) केश लंचन अनिवार्य आहे. जैन भिक्षू आणि आर्यनिकांनी वर्षातून चार वेळा केश लोचन (हातांनी अंगावरील केस उपटणे) करणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेत प्रचंड वेदना होतात. कधी कधी केस तोडतानाही रक्त येते, पण जैन भिक्षू त्याचे पालन करतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 20, 2024 8:38 PM IST
मराठी बातम्या/Viral/
जैन संत कपडे का त्यागतात? वेदना होतात, रक्तही येतं, तरीही ते का करतात 'केशलोचन'?


