advertisement

India Iran: जे अमेरिकेला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं! होर्मुझ सामुद्रधुनीतून पहिलं जहाज मुंबईत दाखल

Last Updated:

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जगभरात इंधनासाठी हाहाकार माजला आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) हा भाग सध्या युद्धाचा आखाडा बनला आहे.

जे अमेरिकेला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं! होर्मुझ सामुद्रधुनीतून पहिलं जहाज मुंबईत दाखल
जे अमेरिकेला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं! होर्मुझ सामुद्रधुनीतून पहिलं जहाज मुंबईत दाखल
नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जगभरात इंधनासाठी हाहाकार माजला आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) हा भाग सध्या युद्धाचा आखाडा बनला आहे. इराणचे नियंत्रण असलेल्या या सामुद्रधुनीतून जहाजांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. अमेरिकेच्या एका जहाजाने सामुद्रधूनी ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला उद्धवस्त करण्यात आले. मात्र, दुसरीकडे भारताच्या कूटनीतीला यश मिळाले आहे. सौदी अरेबियातूम कच्चं तेल घेऊन भारताचं जहाज मुंबईत दाखल झालं आहे.
भारताने आपल्या सघ्या कूटनीतीचा वापर करून अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. सौदी अरेबियातून कच्चं तेल घेऊन निघालेलं 'शेनलोंग' (Shenlong) हे जहाज सुरक्षितपणे मुंबई बंदरात पोहोचले आहे. भारताचा ध्वज असणाऱ्या टँकरला होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक करण्यास इराणने मंजुरी दिली आहे.

जयशंकर यांचा 'तो' फोन ठरला गेमचेंजर...

मंगळवारी १० मार्च रोजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली होती. इराणने आधीच जाहीर केलं होतं की, चीनशिवाय इतर कोणत्याही देशाच्या जहाजाला ते या मार्गावरून जाऊ देणार नाहीत. मात्र, जयशंकर यांनी इराणसोबत असलेल्या भारताच्या ऐतिहासिक मैत्रीचा दाखला देत भारतीय जहाजाच्या सुरक्षेची खात्री करून घेतली. या चर्चेनंतर अवघ्या २४ तासांत हे जहाज सुरक्षितपणे मुंबईत दाखल झालं.
advertisement
इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुला खामेनेंची हत्या झाल्यानंतर भारताने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. इराणवरील हल्ल्याचाही निषेध केला नव्हता. याउलट इस्रायल आणि इराणे हल्ले केलेल्या आखाती देशांच्या प्रमुखांशी पंतप्रधान मोदींनी फोन वरून चर्चा केली होती. त्यामुळे भारत-इराण संबंधात तेढ निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. विरोधकांनीदेखील सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याच्या सचिवांनी इराण दूतावासात भेट देऊन खामेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. त्यानंतर भारत-इराणमध्ये चर्चा सुरू झाल्याचे चित्र दिसले.
advertisement

मुंबईत 'शेनलोंग'चं जोरदार आगमन

बुधवारी दुपारी १ वाजता हे तेल टँकर मुंबई बंदरात पोहोचले आणि संध्याकाळी ६ वाजता त्याला ‘जवाहर द्वीप’वर बर्थ करण्यात आले. या जहाजात तब्बल १,३५,३३५ मेट्रिक टन कच्चं तेल आहे, जे आता माहुल येथील रिफायनरींमध्ये पाठवलं जाईल. या जहाजावर भारत, पाकिस्तान आणि फिलीपीन्सचे एकूण २९ कर्मचारी आहेत.
advertisement

युद्ध सुरू झाल्यापासूनचं पहिलं जहाज

अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून भारताकडे येणारं हे पहिलं जहाज आहे ज्याने मृत्यूच्या दारातून आपली वाट काढली आहे. लाइबेरियाचा ध्वज असलेल्या या जहाजाला सुरक्षा मिळवून देणं ही भारताची मोठी कूटनीतिक विजयाची पावती मानली जात आहे.
'शेनलोंग' सुरक्षित आलं असलं तरी, भारतीय नौवहन महामंडळाच्या मते, अजूनही २८ भारतीय ध्वज असलेली जहाजं युद्धक्षेत्राच्या आसपास आहेत. भारताने आतापर्यंत 'देश महिमा', 'स्वर्ण कमल' आणि 'विशवा प्रेरणा' यांसारख्या ७ जहाजांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश मिळवलं आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
India Iran: जे अमेरिकेला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं! होर्मुझ सामुद्रधुनीतून पहिलं जहाज मुंबईत दाखल
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement