Mumbai : मुंबई-जेएनपीए ई-स्पीड बोट सेवा कधीपासून होणार सुरु? समोर आली सर्वात मोठी अपडेट
Last Updated:
Mumbai to JNPA Water Taxi : मुंबईतून जेएनपीएला जाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता या प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.
मुंबई : मुंबईकर लोकल, मेट्रो अन् मोनोनंतर अजून एक सेवा तुम्हाला मिळणार आहे. सध्या याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. चला तर जाणून घेऊयात मुंबईतील कोणत्या नागरिकांसाना या सेवेचा लाभ घेता येईल.
मुंबईतून जेएनपीए गाठणे होणार सुस्साट
मुंबईसह अन् भागात एकत्र जोडण्यासाठी अनेक प्रकल्प राबवण्यात येत असून त्यातला एक चर्चेत आलेला म्हणजे ई-स्पीड बोट सेवा. ही ई-स्पीड सेवा सुरु होताच जेएनपीए ते मुंबई प्रवास करण सोप होणार आहे. मात्र या सेवेतील बोटींची चाचणी अजून आठवडाभर होणार आहे त्यानंतर ही सेवा सुरु होईल, अशी माहिती जेएनपीएचे जलवाहतुकीचे नियंत्रक कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली.
advertisement
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते या ई-स्पीड बोट प्रकल्पाचे उद्धाटन झाले होते मात्र ही सेवा सुरु करण्यात आलेली नव्हती कारण अनेक सुरक्षेच्या चाचण्या बाकी होत्या. मात्र या महिन्यात एकदा प्रात्यक्षिक होणार आहे मग लवकरही सेवा सुरु होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
कोणत्या गोष्टी चाचणीत तपासल्या जाणार?
ई-स्पीड बोटची चाचणी करताना त्यात स्पीड बोटचा वेग शिवाय प्रवासी वाहतुकीची क्षमता त्यात भविष्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी पाहिल्या जातील.
advertisement
नेमका कोणाल होणार फायदा?
मुंबईहून जेएनपीए बंदरात अनेक कर्मचारी दररोज कामासाठी जात असतात. पण सध्य स्थितीला तिथं जाण्यासाठी लाकडी बोटीचा मार्ग निवडावा लागतो. जो दररोज कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खर्चिक होत होता शिवाय वेळही जास्त जात होता. त्यावर मार्ग काढण्यासाठी ई-स्पीड बोटीचा पर्याय निवडला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 11:34 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबई-जेएनपीए ई-स्पीड बोट सेवा कधीपासून होणार सुरु? समोर आली सर्वात मोठी अपडेट









