Rajasthan Village: एका रात्रीत अख्खं गाव रिकामं; घरातील सामानही तसंच पण गावकरी गायब, कुलधराची भीतीदायक कहाणी
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
शेकडो वर्षांपूर्वी हे ठिकाण एक समृद्ध गाव होतं, ज्याचं नाव कुलधरा होतं. असं मानलं जातं, की इथले लोक हे गाव रातोरात सोडून गेले, जणू ते गायबच झाले
जयपूर 08 ऑगस्ट : राजस्थान हे असं राज्य आहे, जिथे इतिहासाशी संबंधित अनेक रहस्ये आणि कथा प्रत्येक शहरात लपलेल्या आहेत. हीच गोष्ट या राज्याला अधिक खास बनवते. विशेषतः राजे आणि सम्राटांसाठी खास असलेलं हे राज्य काही भीतीदायक घटनांमुळे लोकांना घाबरवतंही. भानगडचा किल्ला हा भारतातील सर्वात भयानक किल्ला म्हणून ओळखला जातो. पण फक्त भानगडच नाही तर इथे एक गावही असंच आहे, जिथे लोक रात्रीच काय तर दिवसाही जायला घाबरतात. या गावाची कहाणी खूपच धक्कादायक आहे. या गावाचं नाव कुलधरा आहे.
जैसलमेरच्या पश्चिमेला सुमारे 17 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. येथे तुटलेली घरं आणि भिंती दिसतात पण माणसं दिसत नाहीत. शेकडो वर्षांपूर्वी हे ठिकाण एक समृद्ध गाव होतं, ज्याचं नाव कुलधरा होतं. मात्र आता ते मोडकळीस आलं आहे. असं मानलं जातं, की इथले लोक हे गाव रातोरात सोडून गेले, जणू ते गायबच झाले. असं त्यांच्यासोबत नेमकं काय झालं? ही कथा 300 वर्षांहून अधिक जुनी आहे. त्या काळात या गावात पालीवाल ब्राह्मण राहत होते.
advertisement
Viral News: लग्नानंतर हनिमूनला गेले; हॉटेलमध्ये जाताच नवरीचं भलतंच कांड, CCTV फुटेज पाहून हादरला पती
असं मानलं जातं की त्या काळात या ठिकाणचे प्रधान सलीम सिंह होते, ज्यांची वाईट नजर या गावातील प्रमुखाच्या मुलीवर पडली जी अतिशय सुंदर होती. त्यांना त्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करायचं होतं. त्यांनी गावकऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं की, त्या मुलीला वाचवण्यासाठी कोणी मधे आलं किंवा तिला लपवण्याचा प्रयत्न केला तर त्या सर्वांना ठार मारलं जाईल. या भीतीपोटी ते गाव आणि आजूबाजूच्या 85 गावांनी बैठक बोलावली आणि एका रात्रीतून अचानक ते निघून गेले.
advertisement
Visit to Kuldhara Haunted Village in Jaisalmer. People from 84 Villages disappeared overnight and it's still a Mystery. pic.twitter.com/IuiJXHWRe4
— Sugrive Meena IRS (@MeenasSugrive) January 15, 2022
आता गाव रिकामं करताना साहजिकच सगळेजण आपापल्या अंथरूण आणि सामान घेऊन इथून निघून गेले असावेत, असं तुम्हाला वाटेल! पण असं झालं नाही. ते सगळे आपापलं सामान, रोजच्या वस्तू, अगदी खाण्यापिण्याचं सगळंच तिथेच टाकून घाईघाईने गावातून निघून गेले. न्यूज 18 हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, गाव सोडताना त्यांनी या ठिकाणाला शाप दिला की या गावात पुन्हा कधीच वस्ती होणार नाही आणि इतर कोणीही तिथे राहू शकणार नाही.
advertisement
आजपर्यंत या गावात कोणीही राहू शकलेलं नाही. अनेक दशकांपासून ते त्याच अवस्थेत आहे. दिवसा किंवा रात्री इथे जाताना भीती वाटत असल्याचा दावा लोकांनी केला आहे. काही लोकांचं असंही म्हणणं आहे, की सलीम सिंहने गावावर इतका कर लादला होता की लोक तो भरू शकले नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी गेले. आता या गावाची देखभाल पुरातत्व सर्वेक्षण आणि भारताकडून केली जाते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 08, 2023 12:48 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Rajasthan Village: एका रात्रीत अख्खं गाव रिकामं; घरातील सामानही तसंच पण गावकरी गायब, कुलधराची भीतीदायक कहाणी







