advertisement

गर्लफ्रेंडसाठी कायपण! तिच्या जागी परीक्षेला लिपस्टिक, टिकली लावून गेला अन्, एक घोळ झाला

Last Updated:

प्रेयसीचा पेपर देण्यासाठी हुबेहुब तिच्यासारखाच गेटअप त्याने केला. यासाठी ओठांना लिपस्टिक, हातात बांगड्या, कपाळावर टिकली आणि तरुणीसारखे कपडे त्याने घातले.

News18
News18
दिल्ली : एक तरुण गर्लफ्रेंडच्या ऐवजी स्वत: तिचा पेपर देण्यासाठी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. परीक्षा द्यायला जाण्याआधी त्याने गर्लफ्रेंडसारखा गेटअपही केला होता. कपाळावर टिकलीसुद्धा लावली. डोळ्यांना लाइनर, ओठांवर लिपस्टिक आणि हातात बांगड्या घालून परीक्षेला हजर राहिला होता. मुलीसारखाच गेटअप करून तो परीक्षा हॉलमध्ये पोहोचला. पेपर द्यायला तो परीक्षा हॉलमध्ये पोहोचला पण पेपर सुरू होताच पकडला गेला.
प्रेयसीसाठी चंद्र तारे आणायच्या गोष्टी असोत किंवा जगण्या मरण्याच्या आणा-भाका तर बरेच घेतात. पण या तरुणाने जे केलंय ते सध्या चर्चेत आहे. अनेकांनी तरुणाच्या व्हायरल झालेल्या लूकवर जोरदार कमेंट केल्या आहेत. तरुणाचे नाव अंग्रेज सिंह असं असून तरुणीचं नाव परमजीत कौर असं आहे.
advertisement
पंजाबच्या फरीदकोट इथं ही घटना घडली आहे. परीक्षा केंद्रात एक तरुण त्याच्या प्रेयसीचा गेटअप करून आला होता. प्रेयसीच्या वेषात येऊन तो परीक्षा देण्याच्या तयारीत होता पण पर्यवेक्षकांनी त्याला पकडला. आता त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ७ जानेवारीला कोटकपूराच्या डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या पॅरा मेडिकल भरतीसाठी परीक्षा होती. यामध्ये फाजिल्का इथं राहणारा अंग्रेज सिंह त्याची प्रेयसी परमजीत कौरच्या जागी पेपर देण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
प्रेयसीचा पेपर देण्यासाठी हुबेहुब तिच्यासारखाच गेटअप त्याने केला. यासाठी ओठांना लिपस्टिक, हातात बांगड्या, कपाळावर टिकली आणि तरुणीसारखे कपडे त्याने घातले. त्याने प्लॅन परफेक्ट केला होता. पण जेव्हा तो दिसला तेव्हा पर्यवेक्षकांना शंका आली. अधिकाऱ्यांनी चेकींग करताच त्याच्याकडे खोटं ओळखपत्र आणि आधारकार्डही होतं. अधिकाऱ्यांनी त्याच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिक डिव्हाइसवर घेतले. त्यामुळे पोलखोल झाली. तरुणीचा अर्ज रद्द करण्यात आला असून आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
गर्लफ्रेंडसाठी कायपण! तिच्या जागी परीक्षेला लिपस्टिक, टिकली लावून गेला अन्, एक घोळ झाला
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement