Buddha Purnima : गौतम बुद्धांनी का सोडलं घरं, का केला कुटुंबाचा त्याग?
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
गौतम बुद्धांनी बोधिवृक्षाखाली बसून तपस्या केली आणि जीवनाचं तत्त्वज्ञान आणि सत्य यांचा अभ्यास केला, हे आपण जाणतो. त्यांनी गृहस्थ जीवनाचा त्याग नेमका कशासाठी केला, याबाबत जाणून घेऊ
नवी दिल्ली : बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी एक दिवस अचानक कुटुंबाचा आणि गृहस्थ जीवनाचा त्याग केला. गृहस्थ आणि कुटुंबाचा त्याग करून ते जंगलाच्या दिशेनं निघून गेले. बोधिवृक्षाखाली बुद्धांनी जवळपास सहा वर्षं तपश्चर्या केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर समाजात अहिंसा, प्रेम, शांती आणि त्याग याचा संदेश त्यांनी दिला आणि समाजातल्या दुष्प्रवृत्तींना दूर करण्याचाही प्रयत्न केला. अत्याचार, भेदभाव, अशांती, अनाचार, अंधविश्वास, तसंच रूढी-परंपरा यांची मुळं समाजात खोलवर रुजलेली असतानाच, गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. तेव्हा दुष्प्रवृत्तींना दूर करण्यासाठी बुद्धांसारख्या महापुरुषाचा जन्म झाला, असं सांगितलं जातं. समाजातल्या अनेक चुकीच्या रूढींमधून लोकांना मुक्त करण्याचं काम गौतम बुद्धांनीच केलं आहे.
महात्मा बुद्धांचं मूळ नाव राजकुमार सिद्धार्थ असं होतं. लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा ते वेगळे होते. लहानपणीसुद्धा ते खोडकर नव्हते. उलट त्यांचा स्वभाव शांत आणि गंभीर होता. ते खूप कमी बोलत असत. बहुतांश वेळ ते एकांतात बसून चिंतन करत असत. गौतम बुद्ध जसजसे मोठे होऊ लागले, तसा त्यांचा स्वभाव आणखी गुंतागुंतीचा होता गेला. हळूहळू गृहस्थ जीवनाबद्दलची त्यांची आवडही कमी होऊ लागली. त्यांचा विवाह झाला आणि त्यांना पुत्रप्राप्तीसुद्धा झाली; पण बुद्धांमधली वैराग्य भावना दिवसेंदिवस वाढत होती. असंच एक दिवस बुद्धांनी कोणाला काहीही न सांगता गृहत्याग केला.
advertisement
का गृहत्याग केला गौतम बुद्धांनी?
अपरिग्रहानंतर आत्म्याच्या जवळ जाण्यासाठी लोक आपापल्या क्षमतेनुसार संपत्तीचा त्याग करतात. परिग्रह म्हणजे संपत्ती जवळ केल्यानं आत्म्याच्या जवळ जाता येत नाही आणि आध्यात्मिक आनंद मिळू शकत नाही. आयुष्यात ज्ञानप्राप्ती करणं हे काही जणांचं ध्येय असतं. असे लोक अपरिग्रह स्वीकारतात. म्हणजेच आत्म्याखेरीज त्यांना अन्य कोणाच्याही म्हणजेच, घर, कुटुंब, संपत्ती आणि अन्य कोणतीही प्रिय वस्तू यांच्या जवळ जाता येत नाही. बुद्धांच्या गृहत्यागाचं कारणही हेच होतं. ते फक्त आपल्या आत्म्याच्या जवळ जाऊ इच्छित होते.
advertisement
बुद्धांची तपस्या
बुद्धांच्या मनात अनेक प्रश्न होते आणि त्या उत्तरांच्या शोधार्थ त्यांनी तपस्या सुरू केली. अनेक वर्षांच्या तपस्येनंतरही त्यांना याची उत्तरं मिळू शकली नाहीत. तेव्हा ते एका वृक्षाखाली जाऊन बसले आणि सत्य जाणल्याशिवाय इथून उठायचं नाही, असा संकल्प त्यांनी केला. याच वृक्षाला आता बोधिवृक्ष या नावानं ओळखलं जातं. याच वृक्षाखाली बुद्धांना पूर्ण आणि दिव्य ज्ञानप्राप्ती झाली होती. अशाच प्रकारे ज्ञान, सत्य यांच्या शोधार्थ बुद्धांना सहा वर्षं लागली आणि 35व्या वर्षी सिद्धार्थ हे गौतमऐवजी महात्मा गौतम बुद्ध झाले.
Location :
Delhi
First Published :
May 12, 2024 3:30 PM IST