Burhanpur News : कुणी फावडा आणला तर कुणी कुदळ आणि चाळणी, छावा सिनेमापाहून उठली अफवा, औरंगजेबचा खजिना लुटण्यासाठी किल्ल्यावर गर्दी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
छावा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. पण या शिवाय सिनेमामुळे लोकांमध्ये एक अफवा देखील पसरली, ज्यामुळे लोकांना हातात कुदळ, फावडा घेऊन खजिना लुटण्यासाठी गर्दी केली.
मुंबई : छावा सिनेमाने महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. लोकांना हा सिनेमा आणि विकी कौशलचा अभिनय खुपच आवडला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. पण या शिवाय सिनेमामुळे लोकांमध्ये एक अफवा देखील पसरली, ज्यामुळे लोकांना हातात कुदळ, फावडा घेऊन खजिना लुटण्यासाठी गर्दी केली.
अफवा अशी आहे की, छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांचा खजिना लुटला होता. या अफव्याने लोकांच्या मनात उत्सुकता आणि कुतूहल निर्माण केलं. हा खजिना बुऱ्हाणपूरजवळील असिरगड किल्ल्या लपवला असल्याचं सांगितलं गेलं, ज्यामुळे या किल्ल्यावर लोकांनी गर्दी केली.
असिरगड किल्ल्यावर हजारो नागरिकांनी एकत्र येऊन खजिना शोधण्याचा मोह धरला आहे. त्यांच्या हातात फावडे, कुदळ घेतले. काहींनी तर मेटल डिटेक्टरसुद्धा घेतलं आणि खजिना शोधण्याच्या तयारीला ते लागले.
advertisement
After watching the film Chhava, people flocked to Burhanpur, hoping to find some of the Mughal treasures hidden there.#Chhava #Burhanpur pic.twitter.com/WyWIXW01Pt
— Amit Karn (@amitkarn99) March 8, 2025
इतिहासातील सोन्याच्या नाण्यांची अफवा आधीपासूनच या भागात पसरली होती, त्यात सिनेमा पासून ही शंका आणखी बळावली, ज्यामुळे आता लोकांनी रात्रंदिवस खोदकाम सुरू ठेवले आहेत.
advertisement
नक्की काय घडलं?
बुऱ्हाणपूर शहरापासून फक्त 18 किमीवर असिरगड किल्ल्याजवळ राष्ट्रीय महामार्ग बांधकाम चालू आहे. काही दिवसांपूर्वी एका बांधकाम कंपनीने खोदलेली माती एका शेतात टाकली असता, काही कामगारांना धातूच्या नाण्यांची चिन्हं सापडली. यावरून अनेक लोकांनी छावा चित्रपटातील बुऱ्हाणपूर लुटीचा संदर्भ देऊन, या परिसरात औरंगजेबाचा खजिना लपला असल्याची अफवा पसरवली.
#Chhaava फ़िल्म देखने के बाद मुग़ल कालीन सोना खोजने मध्य प्रदेश के बुरहापुर ज़िले के असिर्गढ़ किले पहुँचा सैकड़ो का हुजूम !#Chhaava #Burhanpur pic.twitter.com/t45ztt8Zs9
— काश/if Kakvi (@KashifKakvi) March 7, 2025
advertisement
या अफव्यामुळे आजूबाजूच्या शेतात आणि किल्ला परिसरात लोक खोदकाम करत आहेत. काही लोक मेटल डिटेक्टरसह या मोहात सहभागी झाले आहेत आणि काहींनी तर दावा केला की त्यांना नाणी सापडल्या आहेत.
मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर ही एक मुघल छावणी मानली जाते, जिथे दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा प्रमुख मार्ग होता. इथे मुघल काळातील सोन्याच्या नाण्यांची टाकसाळ होती आणि सैनिकांनी या छावणीवरून त्यांचा लुटलेला माल लपवला असावा, असा दावा केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 08, 2025 4:56 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Burhanpur News : कुणी फावडा आणला तर कुणी कुदळ आणि चाळणी, छावा सिनेमापाहून उठली अफवा, औरंगजेबचा खजिना लुटण्यासाठी किल्ल्यावर गर्दी