मेंदू दान करता येतो का? खान सरांनी दिले असे उत्तर की, तुम्ही कधीच विसरणार नाही, VIDEO झाला व्हायरल!

Last Updated:

Khan Sir Video : आपल्या अनोख्या आणि मनोरंजक शिकवण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले खान सर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचे क्लासमधील व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर...

Khan Sir Video
Khan Sir Video
Khan Sir Video : आपल्या अनोख्या आणि मनोरंजक शिकवण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले खान सर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचे क्लासमधील व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्याने त्यांना एक मजेशीर पण विचार करायला लावणारा प्रश्न विचारला.
विद्यार्थी म्हणाला, “सर, तुम्ही इतके हुशार आहात, तर तुम्ही तुमचा मेंदू दान कराल का?” या अनपेक्षित प्रश्नावर खान सरांनी क्षणाचाही विलंब न लावता, 'ब्रेन डोनेशन' म्हणजेच 'मेंदू दान' करण्याची संकल्पना इतक्या सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगितली की सगळेच अवाक् झाले.
"माझा मेंदू दुसऱ्याच्या शरीरात टाकला तर..."
खान सर हसून म्हणाले, “अरे, किडनी किंवा लिव्हरप्रमाणे मेंदूचं प्रत्यारोपण (Transplant) शक्य नसतं. पण समजा, जर माझा मेंदू काढून तुझ्या शरीरात बसवला, तर काय होईल माहितीये? शरीर तुझं राहील, पण आतून तू पूर्णपणे 'खान सर' होशील!” ते पुढे म्हणाले, “तू माझ्यासारखाच विचार करायला लागशील. माझ्यासारखंच पहाटे लवकर उठून क्लास आणि मीटिंगला जायला लागशील. गंमत म्हणजे, तू तुझ्या घरच्यांना ओळखणार नाहीस आणि माझ्या आई-वडिलांना पाहिल्यावर त्यांची आपुलकीने चौकशी करशील. लोक तर म्हणायला लागतील की तुझ्या अंगात 'खान सरांचा भूत' शिरला आहे!”
advertisement
मेंदू दान का शक्य नाही?
या विनोदी उदाहरणातून खान सरांनी एक गंभीर वैज्ञानिक सत्य समजावून सांगितले. ते म्हणाले की, ज्याला आपण 'मन' म्हणतो, तो प्रत्यक्षात आपला मेंदूच असतो. आपले विचार, बोलणे आणि प्रत्येक हालचाल हाच अवयव नियंत्रित करतो. त्यामुळे मेंदू बदलणे म्हणजे व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्वच बदलण्यासारखे आहे. मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचा मेंदू केवळ संशोधनासाठी दान केला जाऊ शकतो, तो दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करता येत नाही. मेंदू प्रत्यारोपण हे केवळ विज्ञान कथा किंवा चित्रपटांपुरतेच मर्यादित आहे, वास्तवात ते शक्य नाही.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
मेंदू दान करता येतो का? खान सरांनी दिले असे उत्तर की, तुम्ही कधीच विसरणार नाही, VIDEO झाला व्हायरल!
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement