"Come To My Room..." आणि आली नाहीस तर.... बनावट स्वामीचा आश्रमातील तरुणींना मेसेज, 16 वर्षांपासून सुरु होता प्रकार

Last Updated:

मागील 16 वर्षांपासून महिलांना सतत अश्लील संदेश पाठवले जात होते आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली जात होती.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : एका खाजगी व्यवस्थापन संस्थेतील तरुण महिलांना एका तथाकथित "स्वामी चैतन्यानंद सरस्वती"ने दीर्घकाळ छळले असल्याचे धक्कादायक वास्तव उघड केलं आहे. या संस्थेत शिकणाऱ्या 50 महिलांच्या मोबाईलमध्ये पोलिसांना मिळालेल्या WhatsApp संदेशांमधून स्पष्ट झाले आहे की, मागील 16 वर्षांपासून महिलांना सतत अश्लील संदेश पाठवले जात होते आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली जात होती.
एका संदेशात "स्वामी" एका तरुणीला श्रीमंतीचे आमिष दाखवतो 'Come to my room... I'll take you on a trip abroad, you won't have to pay anything' (माझ्या खोलीत ये... मी तुला परदेशी फिरायला घेऊन जाईन, तुला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मी सगळा खर्च उचलेन) असा मेसेज करतो, तर दुसऱ्या संदेशात धमकी देतो, "... if you don't obey me, I will fail you..." ("... जर तू माझं ऐकलं नाही तर तुला नापास करेन...")
advertisement
दोन जुन्या तक्रारींकडे दुर्लक्ष
पोलिस तपासातून समोर आले की, स्वामी चैतन्यानंद (मूळ नाव पार्थसारथी, ओडिशा) हा गेल्या 16 वर्षांपासून महिलांना टार्गेट करत आहे. 2009 आणि 2016 मध्ये दोनदा छळाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या, पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. 2016 मधील तक्रारही याच वसंतकुंज आश्रमातील एका तरुणीने केली होती.
पोलिसांच्या मते, स्वामीने जाणीवपूर्वक आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) पार्श्वभूमीच्या मुलींनाच लक्ष्य केलं, कारण त्याला माहित होते की या मुली किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून आवाज उठवला जाण्याची शक्यता कमी आहे.
advertisement
या प्रकरणात तीन महिला वॉर्डनही सामील होत्या, ज्या WhatsApp संदेश आणि फोन कॉलद्वारे मुलींना धमकावत आणि दबाव करत असत. त्यांचेही जबाब नोंदवले गेले आहेत.
सध्या स्वामी कुठे आहे?
या घोटाळ्याचा भांडाफोड झाल्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीला १७ महिलांनी दिल्लीतील डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, स्वामी चैतन्यानंद लंडनमध्ये असल्याचे आढळले. त्यानंतर तो शेवटचा आग्र्यात दिसला, असे पोलिसांनी सांगितले.
advertisement
स्वामीविरुद्ध इतर आरोपही आहेत:
बनावट वाहन क्रमांक प्लेटचा वापर – आश्रमात सापडलेल्या केशरी रंगाच्या Volvo कारवर संयुक्त राष्ट्रांचे (UN) वाहन असल्याचा बनावट डिप्लोमॅटिक क्रमांक लावलेला होता. त्याच्या आश्रमातून अनेक बनावट नंबर प्लेट्स जप्त करण्यात आल्या.
फसवणूक – आश्रम प्रशासनाने स्वतः त्याच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर आश्रमाने त्याला "हाकलले" असल्याचेही सांगितले.
advertisement
धार्मिक संस्थेची प्रतिक्रिया
दिल्लीतील त्याने चालवलेली संस्था ही दक्षिण भारतातील एका प्रख्यात धार्मिक संस्थेची शाखा होती दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठ, श्रींगेरी. या संस्थेने त्याच्या कृत्यांना "अयोग्य" ठरवलं आहे.
या प्रकाराने दिल्लीतील प्रतिष्ठित भागात अनेक वर्षांपासून महिलांचा गैरवापर होत असूनही अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई न केल्याचे उघड झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
"Come To My Room..." आणि आली नाहीस तर.... बनावट स्वामीचा आश्रमातील तरुणींना मेसेज, 16 वर्षांपासून सुरु होता प्रकार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement