Couple Romance : शॉपिंग मॉलच्या टॉयलेटमध्ये कपलचा रोमान्स, 40 मिनिटापासून दरवाजा बंद, Video मध्ये कैद झाला संपूर्ण प्रकार

Last Updated:

सिनेमा, कॅफे, रेस्टॉरंट, ब्रँडेड दुकाने आणि मनोरंजनाच्या गोष्टींमुळे मॉल हे केवळ खरेदीचे केंद्र न राहता तरुण-तरुणींसाठी भेटण्याचं आणि वेळ घालवण्याचं ठिकाण बनले आहे. पण कधी कधी या ठिकाणी अशा घटना घडतात की त्या समाजात चर्चा आणि टीकेचा विषय ठरतात.

कपल रोमान्स
कपल रोमान्स
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी वावरणं, खरेदी करणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं यासाठी शॉपिंग मॉल आज जगभरात लोकप्रिय झाले आहेत. सिनेमा, कॅफे, रेस्टॉरंट, ब्रँडेड दुकाने आणि मनोरंजनाच्या गोष्टींमुळे मॉल हे केवळ खरेदीचे केंद्र न राहता तरुण-तरुणींसाठी भेटण्याचं आणि वेळ घालवण्याचं ठिकाण बनले आहे. पण कधी कधी या ठिकाणी अशा घटना घडतात की त्या समाजात चर्चा आणि टीकेचा विषय ठरतात.
अशीच एक घटना घडल्याचं सोशल मीडियावर समोर आलं आहे. माहितीप्रमाणे, एका तरुण जोडप्याने मॉलमधील सार्वजनिक शौचालयात स्वतःला तब्बल 40 मिनिटं बंद केलं. बाहेर प्रतीक्षा करणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं की आत दोन व्यक्ती आहेत, कारण दाराखालून त्यांना चार पाय दिसले. तिथेच गोंधळ सुरू झाला आणि लगेच मॉलच्या सुरक्षारक्षकांना बोलावण्यात आलं.
गार्डनी दार ठोकलं पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही. शेवटी त्यांनी दार फोडलं. आतून ते जोडपं बाहेर आलं आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना संतापाने बाहेर काढलं. लाजेखातर हे दोघं ताबडतोब पळून गेले.
advertisement
संपूर्ण घटना एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर पोस्ट केली. एका कॅफे शॉपनं देखील तो व्हिडिओ शेअर करत लिहिलं, "40 मिनिटं शौचालयात राहिलेलं जोडपं… आम्हाला माहीत आहे तुम्ही कोण आहात. पुन्हा असं करू नका."
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताच लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. बहुतेकांनी नव्या पिढीवर टीका केली. एका युजरने लिहिलं "पुढच्या वेळी किमान उघड्या बाथरूममध्ये जाऊ नका" ही घटना मलेशियातील आहे.
advertisement
या घटनेमुळे मलेशियामध्ये वाढत्या पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन (PDA) आणि सार्वजनिक ठिकाणी गोपनीयतेच्या प्रश्नांवर चर्चा रंगली आहे. तज्ज्ञांचं मत आहे की किशोरवयीन मुलामुलींमध्ये योग्य लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्याने अशा घटना वाढताना दिसतात. मलेशियन फॅमिली कौन्सिलनुसार, 2025 मध्ये किशोरवयीन गर्भधारणा दर 15% ने वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मॉल प्रशासनाने यापुढे अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या/Viral/
Couple Romance : शॉपिंग मॉलच्या टॉयलेटमध्ये कपलचा रोमान्स, 40 मिनिटापासून दरवाजा बंद, Video मध्ये कैद झाला संपूर्ण प्रकार
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement