या 3 गोष्टी केल्यास गाठाल वयाची शंभरी; डॉक्टरने सांगितलं दीर्घायुषी होण्याचं सिक्रेट, हर्ष गोयंकांनी शेअर केला VIDEO

Last Updated:

डॉ. चोक्सी म्हणाले की, दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी तीन प्रमुख घटक कारणीभूत ठरतात

डॉक्टरने सांगितलं दीर्घायुषी होण्याचं सिक्रेट
डॉक्टरने सांगितलं दीर्घायुषी होण्याचं सिक्रेट
नवी दिल्ली : ‘द राम प्रसाद गोयंका’ (आरपीजी) एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. मायक्रोब्लॉगिंग साईट 'एक्स' आणि इन्स्टाग्रामवर ते फार लोकप्रिय आहेत. ते नेहमी आपल्या अकाउंटवर काही मजेशीर, कल्पक, माहितीपूर्ण व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या गोष्टी नेटिझन्सच्या पसंतीस उतरतात. काहीवेळा नेटिझन्स गोयंकांनी शेअर केलेल्या पोस्ट रिशेअरही करतात. आताही एका व्हिडिओमुळे गोयंका चर्चेत आले आहेत. त्यांनी एका प्रसिद्ध डॉक्टरचा व्हिडिओ शेअर केला आहे.
हर्ष गोयंका यांनी प्रसिद्ध डॉक्टर निशित चोक्सी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. "सिंपल सीक्रेट ऑफ लाँग लाईफ," असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. आजकाल आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि आळसामुळे आपलं आयुर्मान कमी होत आहे. कमी वयातच अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला दीर्घायुषी होण्याचं सिक्रेट जाणून घेण्याची इच्छा आहे. तुम्हालाही हे जाणून घ्यायचे असेल, तर गोयंकांनी शेअर केलेला व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आपल्या व्हिडिओमध्ये डॉ. चोक्सी यांनी 100 वर्षे जगण्यासाठी युक्ती सांगितली आहे.
advertisement
या व्हिडिओमध्ये डॉ. निशित चोक्सी आपल्या 90 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या रूग्णांबद्दल सांगत आहेत. डॉ. चोक्सी म्हणाले की, दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी तीन प्रमुख घटक कारणीभूत ठरतात. कोणत्याही परिस्थितीत आपण आनंदी राहिलं पाहिजे. शारीरिक हालचालींना आणि व्यायामांना प्राधान्य दिलं पाहिजे. सकस आणि पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे. हे तीन घटक दीर्घायुष्यासाठी पुरेसे आहेत.
advertisement
डॉ. चोक्सी यांनी हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. युजर्सना त्यांच्या या टिप्स खूप आवडल्या आहेत. एका युजरने कमेंट करून म्हटलं आहे की, जर तुम्हाला दीर्घायुषी व्हायचं असेल तर तिन्ही घटक खूप उपयुक्त आहेत. आणखी एकाने कमेंट केली की, हे तीन घटक आयुष्य वाढवण्यासाठी पुरेसे आहेत. या शिवाय इतर अनेक यूजर्सनी यावर कमेंट करून आपापली मते व्यक्त केली आहेत.
मराठी बातम्या/Viral/
या 3 गोष्टी केल्यास गाठाल वयाची शंभरी; डॉक्टरने सांगितलं दीर्घायुषी होण्याचं सिक्रेट, हर्ष गोयंकांनी शेअर केला VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement