द्रौपदीने पांडवांसमोर ठेवली होती एक अट; अर्जुनाच्या चुकीमुळे कुत्र्यांना मिळाला शाप
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
द्रौपदीने कुत्र्यांना असा एक शाप दिला, ज्याचे परिणाम ते आजही भोगत आहेत.
नवी दिल्ली : महाभारतातल्या गोष्टी मानवी मनाच्या, भावनांच्या जवळ जाणाऱ्या आहेत. त्यामुळे लोकांना त्या भावतात. महाभारताच्या त्या काळात घडलेल्या घटनांचे परिणाम किंवा त्या काळातल्या वास्तू आजही देशात असल्याचे उल्लेख साहित्यात आढळतात. महाभारतात संदर्भ असलेल्या अशाच एका गोष्टीचा परिणाम आजही कलियुगात पाहायला मिळतो. द्रौपदीने कुत्र्यांना असा एक शाप दिला, ज्याचे परिणाम ते आजही भोगत आहेत.
महाभारत काळात काही घटना अशा घडल्या, की त्याचे परिणाम आजही पृथ्वीवर दिसून येतात. एका घटनेमध्ये पांडवांची पत्नी द्रौपदीने कुत्र्यांना एक शाप दिला. त्या शापामुळे कुत्रे उघड्यावरच संभोग क्रिया करू लागले.
महाभारतात द्रौपदीला पाचही पांडवांशी लग्न करावं लागलं, हे सर्वांना माहीत आहे; मात्र त्या वेळी द्रौपदीने त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. तिने सांगितलं, की एका वेळी एक जणच तिच्या खोलीत येऊ शकेल. ती अट ठेवताना तिने हेही सांगितलं, की पाचही जणांपैकी जो तिच्या खोलीत येईल, त्याने खोलीत प्रवेश करण्याआधी पादत्राणे दाराबाहेर काढून ठेवावीत.
advertisement
Ram Mandir: सीतेला दिसलेला सुवर्णमृग खरोखर अस्तित्वात आहे का? महाराष्ट्रातील या ठिकाणाशी विशेष संबंध
द्रौपदीने तसं सांगण्यामागे कारण होतं. पाचांपैकी कोणी एक जण त्या खोलीत असताना बाहेर असलेली पादत्राणं पाहून दुसऱ्याला ती गोष्ट लगेचच समजेल, असा त्यामागचा उद्देश होता. एक जण खोलीत असताना दुसऱ्या कोणीही त्या खोलीत प्रवेश करायचा नाही अशी द्रौपदीची अट होती.
advertisement
ही अट न पाळणाऱ्याला एक वर्ष वनवासात जावं लागेल, असंही तिनं सांगितलं होतं. अर्थात पांडवांनीही तिची ही अट मान्य केली होती; मात्र एकदा अर्जुनाकडून ती अट मोडली गेली. युधिष्ठिर द्रौपदीसोबत असतानाच एकदा अर्जुन द्रौपदीच्या महालात गेला. त्यानं द्रौपदीला युधिष्ठिरासोबत पाहिलं. यामुळे द्रौपदीच्या अटीचा भंग झाला.
advertisement
या घटनेमुळे द्रौपदीचा अपमान झाला. तिला खूप रागही आला. तिनं अर्जुनाला प्रश्न विचारला, की दाराबाहेर तुला युधिष्ठिराची पादत्राणं दिसली नाहीत का? तेव्हा अर्जुनानं नाही असं उत्तर दिलं. त्यावर युधिष्ठिराने बाहेर जाऊन पाहिलं, तर खरोखरच त्याची पादत्राणं बाहेर नव्हती. त्यांचा शोध घेतल्यावर असं समजलं, की एक कुत्रा त्यांच्याशी खेळत होता.
या घटनेमुळे द्रौपदीला राग आला आणि त्या रागातच तिने समस्त कुत्र्यांना असा शाप दिला, की त्यांची संभोगक्रिया उघड्यावरच होईल. यामुळे कलियुगातही कुत्रे उघड्यावरच ती क्रिया करतात.
Location :
Delhi
First Published :
January 20, 2024 8:15 PM IST
मराठी बातम्या/Viral/
द्रौपदीने पांडवांसमोर ठेवली होती एक अट; अर्जुनाच्या चुकीमुळे कुत्र्यांना मिळाला शाप