काय! काम करता करता खुर्चीवरून उठल्यावर सॅलरी कट, डेस्क सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काही खरं नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात कर्मचारी आपल्या खुर्चीवरून उठला की त्याचा पगार कट केला जात असल्याचा दावा केला जात आहे.
बीजिंग : ऑफिसमध्ये काम करताना काही वेळासाठी आपण ब्रेक घेतो. कशी चहा पिण्यासाठी, नाश्त्यासाठी, जेवणासाठी, टॉयलेटसाठी असे मधे मधे ब्रेक घेतो. पण आता हेच छोटे छोटे ब्रेक कर्मचाऱ्यांना महागात पडणार असंच दिसतं आहे. कारण खुर्चीवरून उठल्यावर कर्मचाऱ्यांचा पगार कट होत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात कर्मचारी आपल्या खुर्चीवरून उठला की त्याचा पगार कट केला जात असल्याचा दावा केला जात आहे. एका ऑफिसचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कर्मचारी ऑफिसमध्ये काम करत आहेत. त्यांच्याभोवती हिरव्या रंगाचे बॉक्स दिसत आहे.
एक महिला आपल्या खुर्चीवरून उठते आण उभं राहून एका सहकाऱ्याशी बोलू लागते. यावेळी तिच्या खुर्चीभोवती असलेला हिरवा बॉक्स लाल रंगाचा होतो आणि तिथं वेळ दिसते, काऊंटडाऊन सुरू होतो. तर तिच्या शेजारी असलेल्या कर्मचारी जो काही काम करत नाही आहे, पण फक्त खुर्चीवर बसला आहे, त्याच्याभोवती ग्रीन बॉक्सच आहे. महिला जितका वेळ महिला खुर्चीवर किंवा डेस्कवर नाही तितक्या वेळाचा तिचा पगार कट होणार असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.
advertisement
यात व्हिडीओत पुन्हा आणखी एक दृश्य आहे. एक कर्मचारी खुर्ची आणि डेस्कवर पाय सोडून आराम करतो आहे. त्याच्या खुर्चीभोवतीही रेड बॉक्स आहे आणि वेळ दिसते आहे. तर त्याच्या शेजारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खुर्चीभोवती ग्रीन बॉक्स आहे. त्याच्या शेजारची महिला कर्मचारी आपल्या खुर्चीवरून उठते आणि त्या व्यक्तीला सावध करते. तशी ती व्यक्ती खुर्चीत नीट बसते. महिलाही खुर्चीवर बसते. जेव्हा ही महिला खुर्चीवरून उठते तेव्हा तिच्या खुर्चीभोवतीही रेड बॉक्स येतो आणि काऊंटडाऊन सुरू होतं. जशी ती महिला आपल्या खुर्चीवर बसते आणि ती व्यक्तीही खुर्चीवर नीट बसते त्यावेळी त्यांच्या खुर्चीभोवतीचा रेड बॉक्स जाऊन तिथं ग्रीन बॉक्स येतो.
advertisement
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे माहिती नाही. पण चीनमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. चीनमधील कंपन्या एआयचा अशा पद्धतीने वापर करत आहेत असा दावा केला जातो आहे. जर कुणी कर्मचारी खुर्चीवर उठला किंवा आराम करत असेल तर एआय त्याला पकडून त्याचा पगार कापण्याची प्रक्रिया सुरू होते.
advertisement
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. कदाचित तुमच्याही कंपनीत असं काहीतरी असू शकतं आणि तुम्हाला याची माहिती नसेल. त्यामुळे आता ऑफिसमध्ये ब्रेक घेताना जरा जपूनच राहा. या व्हिडीओवर तुमची यावरील प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Delhi
First Published :
September 26, 2025 1:53 PM IST
मराठी बातम्या/Viral/
काय! काम करता करता खुर्चीवरून उठल्यावर सॅलरी कट, डेस्क सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काही खरं नाही