अजब प्रकरण! नवरा म्हणाला 'हुंडा नको', नवरीच्या वडिलांनी लग्नच मोडलं; भानगड काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dowry Incident : एका सोशल मीडिया युझरने पोस्ट केली आहे. ज्याने सांगितलं की त्याच्या चुलत भावाचं लग्न मोडलं कारण त्याने हुंडा घेण्यास नकार दिला. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हे त्याने पोस्टमध्ये सांगितलं आहे.
नवी दिल्ली : नवरीकडून हुंडा नाही म्हणून लग्न मोडल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण हुंडा नाकारला म्हणून लग्न मोडल्याचं तुम्ही कधी ऐकलं होतं का? असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. ज्यात नवरा मुलाने हुंडा नाकारला म्हणून नवरीच्या वडिलांनी लग्न मोडलं आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झालं आहे.
हुंडासारख्या प्रथा अजूनही समाजात प्रचलित आहेत. आता जबरदस्तीने हुंडा मागण्याचं नाही तर जबरदस्तीने हुंडा देण्याचं प्रकरण समोर आलं आहे. रेडिट पोस्टवर एका युझरने पोस्ट केली आहे. ज्याने सांगितलं की त्याच्या चुलत भावाचं लग्न मोडलं कारण त्याने हुंडा घेण्यास नकार दिला. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, हे त्याने पोस्टमध्ये सांगितलं आहे.
advertisement
ही संपूर्ण कथा रेडिटवर r/ThirtiesIndia नावाच्या अकाऊंटवर सांगण्यात आली आहे. युझर म्हणाला, माझा चुलत भाऊ चांगला कमाई करतो. त्याच्या पालकांच रिअल इस्टेट, रेस्टॉरंट्स आणि पब आहेत, त्यांच्याकडे वडिलोपार्जित मालमत्ता आहे आणि तो दिसायलाही चांगला आहे. त्याला अरेंज मॅरेज करायचं होतं. त्याला एक चांगली मुलगी मिळाली जी शिक्षित, करिअर फोकसं आणि चांगलं कौटुंबिक मूल्ये असलेली होती.
advertisement
चर्चेनंतर दोन्ही पक्ष लग्नाला सहमत झाले. मग मुलीच्या वडिलांनी माझ्या चुलत भावाला विचारलं की त्याला हुंडा म्हणून काय हवं आहे. माझ्या चुलत भावाने उत्तर दिले, "काहीही नको, मला ते मान्य नाही." मुलीच्या वडिलांनी आग्रह धरला, "किमान काही भेटवस्तू घ्या, जसं की रेंज रोव्हर किंवा डुप्लेक्स फ्लॅट." माझ्या चुलत भावाने तरीही नकार दिला.
advertisement
शेवटी मुलीच्या वडिलांनी माझ्या चुलत भावाला लग्नासाठी स्पष्टपणे नकार दिला. त्याचा तर्क काय होता? तर ते म्हणाले, "एक श्रीमंत माणूस त्याची किंमत जाणतो. जर तो हुंडा नाकारत असेल तर त्याच्यात काहीतरी चूक असेल."
advertisement
या पोस्टच्या शेवटी असं म्हटलं होतं की, 'मला आनंद आहे की माझा भाऊ पळून गेला.' या पोस्टवर अनेक युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने म्हटलं, "ज्यांच्याकडे पैसे आहेत ते दुसऱ्या गोष्टीवर वर्चस्व मिळवू इच्छितात आणि इथं परिस्थिती अशीच आहे." बहुतेक युझर्सनी मुलीमध्ये काहीतरी खोट असावी असं म्हटलं आहे.
Location :
Delhi
First Published :
October 08, 2025 11:48 AM IST