घो मला असला हवा! गरीब चालेल पण... तरुणीने लग्नासाठी ठेवली अशी अट, बायोडेटा तुफान VIRAL
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding News : खुशी या फेसबुक पेजवर एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे जो व्हायरल होत आहे. हा फोटो एका मुलीच्या बायोडेटाचा आहे. मुलीच्या बायोडेटामध्ये लोकांचं लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे लग्नाची अट.
नवी दिल्ली : अरेंज मॅरेज करताना आपल्याला कसा वर किंवा वधू हवी याबाबतच्या अपेक्षा दिल्या जातात. लग्नासाठी वरवधू शोधताना बायोडेटा तयार केला जातो. त्यात आपली माहिती आणि आपल्याला कसा जोडीदार हवा आहे ते सांगितलं जातं. असाच एक लग्नासाठीचा तरुणीचा बायोडेटा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. मुलगी लग्नासाठी मुलगा शोधत आहे. पण तिने वरासाठी अशी अट घातली की ती वाचून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
खुशी या फेसबुक पेजवर एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे जो व्हायरल होत आहे. हा फोटो एका बायोडेटाचा आहे. हा कृतिका मीना नावाच्या मुलीचा बायोडेट आहे. बायोडेटानुसार तिचं जन्मस्थान अजमेर आहे, वय 26 वर्षे आहे, तिचे वडील राहुल मीना दुकानदार आहेत. मुलीने एमएपर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि तिला शिवणकाम आणि नृत्याची आवड आहे, पण ती कोणतीही नोकरी करत नाही.
advertisement
मुलीच्या बायोडेटामध्ये लोकांचं लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे लग्नाची अट. ती कोणती, तर गरीब चालेल, पण मुलगा असा असावा जो कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थ सेवन करत नाही. मुलासाठी जातीचं बंधन नाही. आजच्या काळात, असं क्वचितच दिसून येतं की एखाद्या मुलीला किंवा मुलीच्या कुटुंबाला असा मुलगा हवा आहे ज्याच्याकडे नोकरी नाही पण तो व्यसनमुक्त आहे.
advertisement

एका युझरने म्हटलं, मी तयार आहे. एकाने म्हटलं, माझा एक मित्र लग्नासाठी उत्सुक आहे. अनेकांनी पोस्टमध्ये त्यांचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर देखील लिहिलं आहे. अनेक लोक या मुलीचा बायोडेटा सार्वजनिकरित्या दिल्याबद्दल ट्रोल देखील करत आहेत. एकाने म्हटले आहे- "तुम्ही मीना जातीची प्रतिमा का खराब करण्याचा प्रयत्न करत आहात, जर जातीचे बंधन नसेल तर ऑनलाइन लग्न शोधण्याची काय गरज आहे, कुठेही करा.
advertisement
जेव्हा तुम्ही या मुलीचा चेहरा पाहता तेव्हा तुम्हाला समजेल की हा फोटो खरा नाही तर एआयने बनवल्यासारखा दिसतो आहे. तुमची या पोस्टवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
view commentsLocation :
Delhi
First Published :
September 04, 2025 1:57 PM IST
मराठी बातम्या/Viral/
घो मला असला हवा! गरीब चालेल पण... तरुणीने लग्नासाठी ठेवली अशी अट, बायोडेटा तुफान VIRAL


