Pregnancy News : 'प्लीज मुलं जन्माला घालू नका, नाहीतर...' एक्सपर्टचा कपल्सना इशारा, सांगितला धोका
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pregnancy Tips In Marathi : तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटले. एक अशीच एक्सपर्ट जिने चक्क कपलला मुलं जन्माला घालू नका, असा सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली : आपण आईबाबा व्हावं, आपल्याला मूल हवं असं स्वप्न कितीतरी कपल्सचं असतं. लग्नाच्या काही वर्षांनंतर कपल प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतात. प्रेग्नन्सी सुरक्षित व्हावी यासाठी तज्ज्ञांचाही सल्ला घेतात. पण तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटले. एक अशीच एक्सपर्ट जिने चक्क कपलला मुलं जन्माला घालू नका, असा सल्ला दिला आहे.
एका एक्स्पर्टने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. श्वेता गांधी असं त्यांचं नाव, त्या एनएलपी मास्टर कोच आहे. त्यांनी कपल्सना मुलांबाबत इशारा दिला आहे.
श्वेता गांधी म्हणतात, "नवविवाहित जोडप्यांना मी हा महत्त्वाचा सल्ला देऊ इच्छिते की लग्नानंतर लगेचच आनंदाची बातमी देण्याची घाई करू नका. कारण लग्न स्वतःमध्ये एक खूप मोठा बदल आहे."
advertisement
त्या पुढे म्हणाल्या, "लग्नाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कपल एकमेकांना, त्यांच्या मनःस्थिती, सवयी, अपेक्षा, आर्थिक परिस्थिती, सासरचे लोक आणि घरातील संपूर्ण वातावरण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही या वेळी तुमच्या आयुष्यात मूल आणलं तर तुम्हाला श्वास घेण्याचीही संधी मिळणार नाही. आता जर तुमचं वैवाहिक जीवन मजबूत नसेल तर पालकत्वात अडचणी येतील आणि तुमच्या मुलाला त्याची किंमत मोजावी लागेल"
advertisement
advertisement
लग्नानंतर मिळणारा वेळ तुम्हाला लग्नाची गतिशीलता समजून घेण्यास, तुमचे नातेसंबंध मजबूत करण्यास आणि एक मजबूत पाया तयार करण्यास मदत करेल असे तज्ञ शेवटी म्हणतात. जेव्हा घरातील वातावरण, आर्थिक परिस्थिती आणि नातेसंबंध पूर्णपणे स्थिर असतात, तेव्हा तुम्ही आरामात मुलाला या जगात आणू शकता. यासाठी जोडप्यांनी किमान दोन वर्षे वाट पाहावी, असं त्यांनी सांगितलं.
Location :
Delhi
First Published :
August 29, 2025 12:17 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pregnancy News : 'प्लीज मुलं जन्माला घालू नका, नाहीतर...' एक्सपर्टचा कपल्सना इशारा, सांगितला धोका