वेड्या बहिणीची वेडी ही माया! भावाच्या लग्नासाठी नोकरीला मारली लाथ, म्हणाली, माझं चुकलं काय?

Last Updated:

Woman leave job for brother wedding : एक महिला जिच्या भावाचं लग्न तिला लग्नासाठी सुट्टी हवी होती, पण कंपनीने ती नाकारली. त्यानंतर या महिलेने थेट नोकरीच सोडली आहे. महिलेची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : लग्नसोहळा हा कित्येकांसाठी आनंदाचा क्षण. मग ते स्वत:चं असो वा दुसऱ्याचं. घरातील लग्न असेल तर एका दिवसापेक्षा जास्त दिवस सुट्टी टाकली जाते. अशीच एक महिला जिच्या भावाचं लग्न तिला लग्नासाठी सुट्टी हवी होती, पण कंपनीने ती नाकारली. त्यानंतर या महिलेने थेट नोकरीच सोडली आहे. महिलेची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
भावाच्या लग्नासाठी नोकरी सोडणाऱ्या या महिलेची सोशल मीडिया पोस्ट तुफान व्हायरल होते आहे. महिलेने यात काय काय घडलं ते सांगितलं आहे. रेडिटवर तिने पोस्ट केली आहे. ज्यात ती म्हणाली, चार वर्षांपासून मी कंपनीत काम करत होते. नेहमी ओव्हरटाईम करत असे, नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असे आणि कठीण काळात कमी पगारावरही काम करत असे.
advertisement
महिला कर्मचाऱ्याच्या भावाचं लग्न अमेरिकेत होतं. यासाठी तिने कंपनीकडे 3 आठवडे आधीच 15 दिवसांची रजा मागितली. पण कंपनीने तिला लग्नाला उपस्थित राहण्याचा किंवा नोकरी सोडण्याचा अल्टिमेटम दिला. यानंतर तिने तडजोड करण्याचा प्रयत्न केला आणि रजेचे दिवस कमी केले, पण कंपनी सहमत झाली नाही.
advertisement
महिला म्हणाली, 'मला माझ्या भावाचं लग्न आणि माझी नोकरी यापैकी एक निवडण्यास सांगण्यात आलं. मी या कंपनीला सर्व काही दिलं मला काही समजूतदारपणाची अपेक्षा होती, पण माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता.' मी माझी नोकरी सोडून चूक केली का?
advertisement
@Chuckythedoll या रेडिट अकाऊंटवर ही पोस्ट आहे. युझर्सनी कंपनीवर संताप व्यक्त केला आहे. इतर कर्मचारीही तिच्या समर्थनार्थ आले आणि कंपनीच्या कठोर वृत्तीवर टीका केली. एका युझरने लिहिलं, 'माझ्या मार्गदर्शकाने म्हटलं होतं की वैयक्तिक जीवनाला प्राधान्य दिलं पाहिजे. व्यावसायिकांना त्यानुसार जुळवून घ्यावं लागतं.' दुसऱ्याने म्हटले की मी संपूर्ण पोस्ट वाचलीही नाही, मी शीर्षकावरून असं म्हणू शकतो की तुम्ही योग्य काम केलं.
advertisement
तुम्हाला काय वाटतं, महिलेचा निर्णय योग्य आहे की नाही? तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
view comments
मराठी बातम्या/Viral/
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भावाच्या लग्नासाठी नोकरीला मारली लाथ, म्हणाली, माझं चुकलं काय?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement