'वजन कमी करा आणि लाखोंचा बोनस मिळवा', कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त ऑफर, कंपनी कोणती?

Last Updated:

Company weight loss bonus offer : तुम्ही कोणत्या कंपनीने वजन घटवण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोनस दिल्याचं ऐकलं आहे का? वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण एक अशी कंपनी आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर बोनस देते.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
नवी दिल्ली : कंपनी म्हटलं की तिथं स्पर्धा असते. टार्गेट असतात. कोण किती चांगलं आणि जास्त काम करत त्यावर बोनसही दिला जातो. पण कधी तुम्ही कोणत्या कंपनीने वजन घटवण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोनस दिल्याचं ऐकलं आहे का? वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण एक अशी कंपनी आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर बोनस देते.
कंपनीने 12 ऑगस्ट रोजी त्यांचं वार्षिक 'मिलियन युआन वेट लॉस चॅलेंज' सुरू केलं. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित केलं जात आहे. या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचे नियम खूप सोपे आहेत. कोणताही कर्मचारी नोंदणी करू शकतो आणि प्रत्येक 0.5 किलो वजन कमी केल्यावर 500 युआन म्हणजे सुमारे 6100 रुपये बोनस मिळतो.
advertisement
2022 पासून कंपनीने सात वेळा हे चॅलेंज आयोजित केलं आहे आणि सुमारे 20 लाख युआन म्हणजे सुमारे 2.47 कोटी रुपये किमतीची बक्षीसं वाटली आहेत.  गेल्या एका वर्षात 99 कर्मचाऱ्यांनी मिळून 950 किलो वजन कमी केलं आणि आपापसात दहा लाख युआनचा बोनस वाटला.
advertisement
या वर्षी जनरल-झेड कर्मचारी शी याकीने 90 दिवसांत 20 किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं आणि वजन कमी करणाऱ्या चॅम्पियनचा किताब जिंकला. तिला 20000 युआन म्हणजे सुमारे 2.47 लाख रुपये रोख बक्षीस मिळालं. शीने तिच्या यशाचं श्रेय शिस्त, नियंत्रित आहार आणि दररोज दीड तासांच्या व्यायामाला दिलं.  ती म्हणाली, 'मला वाटतं की हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ आहे, जेव्हा मी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनू शकते. ही केवळ सौंदर्याची बाब नाही तर आरोग्याचीही बाब आहे.'
advertisement
शी हिने तिच्या सहकाऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी ग्रुप चॅटमध्ये 'किन हाओ वजन कमी करण्याची पद्धत' देखील शेअर केली. हा वादग्रस्त डाएट प्लॅन आहे, ज्याच्या मदतीने चिनी अभिनेता किन हाओने 15 दिवसांत 10 किलो वजन कमी केलं. यात एका दिवशी फक्त सोया दूध पिणं, दुसऱ्या दिवशी फक्त कॉर्न किंवा फळं खाणं असे कठोर नियम समाविष्ट आहेत.
advertisement
कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितलं की, 'या चॅलेंजद्वारे आम्हाला निरोगी जीवनशैलीचा प्रचार करायचा आहे. आम्हाला कर्मचाऱ्यांना कामापेक्षा त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रेरित करायचं आहे. हे त्यांच्यासाठी एक सकारात्मक प्रोत्साहन आहे, जेणेकरून ते जीवनात सहभागी होऊ शकतील आणि नवीन ऊर्जेने काम करू शकतील. '
advertisement
आता ही कंपनी कोणती हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. संपूर्ण लेख वाचल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत ही कंपनी भारतातील नाही हे तर समजलंच असेल. तर साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार ही कंपनी चीनची प्रसिद्ध टेक कंपनी अराशी व्हिजन इंक आहे ज्याला इन्स्टा360 म्हणूनही ओळखलं जातं. जिने आपल्या कर्मचाऱ्यांना वजन कमी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे.
मराठी बातम्या/Viral/
'वजन कमी करा आणि लाखोंचा बोनस मिळवा', कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त ऑफर, कंपनी कोणती?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement