नवऱ्याची अंडरविअर गळ्यात लटकवून भाजी आणायला गेली बायको, गावभर फिरली, VIDEO VIRAL

Last Updated:

Wife make husband underwear bag : एक महिला जिने तिच्या नवऱ्याच्या अंडरवेअरचा असा वापर केला ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल.

News18
News18
नवी दिल्ली : मध्यमवर्गीय घरांमध्ये जुन्या गोष्टी नवीन पद्धतीने वापरण्याची पद्धत खूप जुनी आहे. अगदी कपडेही जुने झाले किंवा फाटले की ते फेकून दिले जात नाहीत. तर त्याचा वेगळाच वापर केला जातो. त्यातील एक सामान्य वापर म्हणजे पायपुसणं बनवणं. शक्यतो अंडरवेअरचा असा वापर केला जात असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण एक महिला जिने तिच्या नवऱ्याच्या अंडरवेअरचा असा वापर केला ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल.
एक महिला नवऱ्याची अंडरवेअर गळ्यात घालून भाजी घेताना दिसली. महिलेचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेच्या गळ्यात पुरुषाची अंडरवेअर लटकवलेली आहे. ती उघडते आणि त्यात भाजी घेते. अगदी पिशवीसारखा तिने अंडरविअरचा वापर केला आहे.
advertisement
हा व्हिडीओ पाहणाऱ्या कित्येकांना लाज वाटली असेल. पण महिलेचा चेहरा पाहाल तर ती अगदी बिनधास्त आहे. जणू असं काही करणं म्हणजे सामान्यच आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. राधिका एक कंटेंट क्रिएटर आहे. ती असेच मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत असते. त्यामुळे तिने अशी गळ्यात लटकवलेली अंडरवेअर लटकवली तीसुद्धा फक्त हा असा मजेशीर व्हिडीओ बनवण्यासाठी.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Radhikariya Kumawat (@radhhikariya)



advertisement
ही डॉलर कंपनीची अंडरवेअर आहे जी बॅगमध्ये बनवली गेली आहे. महिलेने ती दोरी शिवून तिच्या गळ्यात लटकवली आहे. राधिकाने स्वतः कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, बाजारात एक नवीन बॅग आली आहे.
व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. एकाने म्हटलं आहे, डॉलर्सची एक नवीन बॅग लाँच झाली आहे. एकाने म्हटलं आहे, डॉलरचा हा सर्वात योग्य वापर आहे, दुसऱ्याने म्हटलं आहे, भाज्या डॉलर्समध्ये जात आहेत. तर एका युझरने म्हटलं, बिच्चारा नवरा घरी अंडरवेअर शोधत असेल.
advertisement
तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
मराठी बातम्या/Viral/
नवऱ्याची अंडरविअर गळ्यात लटकवून भाजी आणायला गेली बायको, गावभर फिरली, VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement