अरे देवा! चिरडायचा होता फक्त लिंबू, महिलेने 23 लाखांच्या कारचा केला चक्काचूर, घडलं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Showroom mahindra thar roxx car accident : नवीन कार घेतल्यानंतर खाली लिंबू ठेवून त्यावरून गाडीचं एक चाक नेलं जातं. अशीच घटना ज्यात लिंबूवरून कार न्यायची होती पण महिलेने कारचा चक्काचूर केला आहे.
नवी दिल्ली : नवीन गाडी म्हणजे घरातील एक नवा सदस्यच. गाडी घेतली की त्यावर कुंकून स्वस्तिक काढलं जातं, त्याला हार घातला जातो, त्याच्यासमोर नारळ फोडला जातो, त्याची पूजा केली जाते. यासोबत नवीन कार घेतल्यानंतर खाली लिंबू ठेवून त्यावरून गाडीचं एक चाक नेलं जातं. अशीच घटना ज्यात लिंबूवरून कार न्यायची होती पण महिलेने कारचा चक्काचूर केला आहे.
महिलेने ब्रँड न्यू महिंद्रा थार रॉक्स खरेदी केली. कारची डिलीव्हरी हेती. सेल्समनने कारचे सगळे फिचर्स समजावल. यानंतर गाडीची पूजा सुरू झाली. यावेळी गाडी लिंबूवरून न्यायची होती. यासाठी हलका एस्केलेटर दाबायचा होता. पण महिलेने चुकून इतक्या जोरात एस्केलेटर दाबला की कार वेगाने पुढे गेली.
advertisement
कार शोरूमच्या पहिल्या मजल्यावर होती. त्यामुळे महिलेने एस्केलेटर दाबताच शोरूमची काच तोडून बाहेर आली. ती थेट फूटपाथवरच आली. पहिल्या मजल्यावरून कार 15 फूट खाली कोसळली. अपघातावेळी गाडीत महिलेह तिचा नवरा आणि सेल्समन होता. सुदैवाने एअरबॅग्ज उघडले. त्यामुळे त्यांच्या जीवावर बेतलं नाही, फक्त दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
advertisement
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार ही घटना दिल्लीतील आहे. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता छत खाली आणि चाकं वर अशी कार उलट्या स्थितीत आहे. गाडीच्या काचा फुटल्या आहेत. ऑटो महिंद्राच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार महिंद्रा थार रॉक्सची किंमत 12 ते 23 लाखांपर्यंत आहे. एक लिंबू चिरडताना लाखोंच्या कारचा चक्काचूर झाला आहे.
Location :
Delhi
First Published :
September 10, 2025 9:25 AM IST
मराठी बातम्या/Viral/
अरे देवा! चिरडायचा होता फक्त लिंबू, महिलेने 23 लाखांच्या कारचा केला चक्काचूर, घडलं काय?